Saturday, May 18, 2024
Homeराजकारणपेट्रोलच्या दरात सलग 19 व्या दिवशी वाढ ; जितेंद्र आव्हाड यांनी मोदींचा...

पेट्रोलच्या दरात सलग 19 व्या दिवशी वाढ ; जितेंद्र आव्हाड यांनी मोदींचा जुना फोटो ट्विट करून केली टीका ; अक्षय कुमारला हि विचारले प्रश्न

(मुंबई) :- गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातभरात लॉकडाऊन जाहीर केले होते, त्यानंतर सरकारने पुन्हा सावध पावले टाकत  लॉकडाऊन बाबत काही क्षेत्राला सूट दिली. 

    तेव्हा पासून देशभरात सलग एकोणीसव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. 

अशी झाली मुंबईत पेट्रोलची दर वाढ

६ जून : ₹ ७८.३२

७ जून: ₹ ७८.९१

८ जून: ₹ ७९.४९

९ जून: ₹ ८०.०१

१० जून: ₹ ८०.४०

१२ जून: ₹ ८१.५३

१४ जून: ₹ ८२.७०

१६ जून: ₹ ८३.६२

१८ जून: ₹ ८४.६६

२० जून: ₹ ८५.७०

२२ जून: ₹ ८६.३६

२४ जून: ₹ ८६.५४

२५ जून: ₹ ८६.७० 

    आज मुंबईत पेट्रोलच्या किंमती मध्ये १६ पैशांनी वाढ होऊन ८६.७० इतकी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या दर वाढीच्या किंमती मध्ये पहिल्या दिवसापासून आता पर्यंत आठ रुपये ३० पैसे तर डिझेल १०.३९ रुपयांनी महागले आहे, अशा किंमती प्रति लिटर झाल्या आहेत. तर आज डिझेलच्या किंमती मध्ये ५४ पैशांची वाढ होऊन ७८.३४ अशी झाली आहे.

     दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे की, “आज पेट्रोल व डिझेल चे भाव पुन्हा वाढवले पेट्रोल १७ पैसे ते २० पैसे तर डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे.  महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपये ही होर्डींग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल”

 जितेंद्र आव्हाड यांचा अभिनेता अक्षय कुमारला सवाल

     जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारने २०११ मध्ये केले ट्विट घेऊन, त्यावर ट्विट केले आहे कि, आपण ट्विटरवर सक्रिय नाही, 

आपण कार वापरणे थांबविले आहे का ..?

आपण वृत्तपत्र वाचू शकत नाही, 

 “पेट्रोल डिझलच्या किमती वाढल्या आहेत” हे, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगत आहे. असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, अक्षय कुमार ने १६ मे २०११ ला ट्विट केले होते की, “माझ्या घरीदेखील रात्री घरी जाऊ शकलो नाही कारण पुन्हा किंमती वाढण्याआधीच संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती.”

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय