Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयविरोध चीनचा आणि नकाशा अमेरिकेचा; कोलकत्ता येथील भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप असल्याचे सोशल...

विरोध चीनचा आणि नकाशा अमेरिकेचा; कोलकत्ता येथील भाजप कार्यकर्त्यांचा प्रताप असल्याचे सोशल मिडिया ट्रोल.

(कोलकत्ता) :- गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनच्या सीमेवर तणावाचे वातावरण होते, भारत आणि चीन सीमेवर १५ जून रोजी झालेल्या हिंसेमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय नागरिकांनी रस्त्यावर येऊन चीन विरोधात तीव्र निदर्शने केली. त्यानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची मागणी देशभर जोर धरु लागली आहे. ही मागणी अगदी सोशल मिडियापासून ते रस्त्यांवर उतरुनही आंदोलन केलं जात आहे. चीन विरोधातील राग व्यक्त करण्यासाठी चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे फोटो, मेड इन चायना वस्तू जाळण्यात येत आहेत. असं असतानाच पश्चिम बंगालमधील अशाच एका चिनी मालावर बहिष्कार घालण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनामध्ये चक्क अमेरिकेचा नकाशा वापरण्यात आल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

    पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्त्यांनी चीनला विरोध करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांचा पुतळा जाळला होता.

   हे प्रकरण ताजे असतानाच आता कोलकात्यामधील एका आंदोलनामध्ये चिनी कंपन्यांना विरोध करताना आंदोलकांना बॅनरवर चक्क अमेरिकेचा नकाशा लावल्याचे दिसून आलं आहे. सध्या या आंदोलनातील या बॅनरचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. अमेरिकेच्या नकाशावर चीनचा राष्ट्रध्वज लावल्याचे या बॅनरमध्ये दिसत आहे.

  या संदर्भात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास यांनी भाजपाचेच कार्यकर्ते असल्याचे ट्विट केले आहे.

तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मुहम्मद सलीम यांनी सुध्दा ट्विट केले आहे कि, “चिनी पंतप्रधान ‘किम जोंग उन’च्या विरोधात निषेध केला, आता अमेरिकेच्या नकाशावर कोलकाता येथे चीनवर बहिष्कार टाकला जात आहे.” तसेच त्यांनी एका बातमीचा फोटो जोडलेला आहे, त्यात भाजपाचेच कार्यकर्ते असल्याच्या आशयाचे ट्विट केले आहे.

सोशल मिडिया आणि ट्विटरवर हे फोटो वायरल होत असून ट्रोल होताना दिसत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय