Sunday, May 19, 2024
Homeग्रामीण५ व ६ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन; 'या' आहेत मागण्या.

५ व ६ सप्टेंबर रोजी बांधकाम कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन; ‘या’ आहेत मागण्या.


कोल्हापूर
 : बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना सुरू करा या मागणीसाठी ५ व ६ सप्टेंबर रोजी संपुर्ण राज्यभर बांधकाम कामगार गावागावात आंदोलन करणार असल्याची माहिती बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी महाराष्ट्र जनभूमीशी बोलताना सांगितले.

भाजप सरकारने बंद केलेली बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करा या प्रमुख मागणींसह अन्य मागण्यांसाठी 5 सप्टेंबर रोजी संपुर्ण राज्यभर गावागावातील बांधकाम कामगार आंदोलन करणार असल्याची माहिती लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ शिवाजी मगदूम यांनी दिली.

५ सप्टेंबर रोजी सिटू, किसान सभा आणि शेतमजूर संघटनेच्या वतीने ११ ते २ वाजेपर्यंत कामगार, शेतकरी आणि शेतमजूर यांनी एकत्र येऊन सरकारच्या कामगार, शेतकरी आणि शेतमजूर विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे.

यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना चालू करा, बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोन, लँपटाँप, टँबलेट दया, बांधकाम कामगारांना घरासाठी तात्काळ अनुदान द्या. सर्व असंघटीत कामगारांना कोविड अनुदान रुपये दहा हजार दयावेत, सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना रुपये २००० आणि ३००० रुपयांचा लाभ दया, ६० वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना लागू करा,जालना जिल्हाधिकारी बिनवडे यांनी आंदोलन करणाऱ्या कॉ गोविंद आर्दड यांना अर्वाच व गुंडगिरीची भाषा वापरली त्यांची ताबडतोब बदली करा, या मागणीसह, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी ची अंमलबजावणी करा, कोविड काळातील विज बिल माफ करा, ऊसतोडणी, रिक्षा, टेम्पो, स्कूल बसेस, ट्रक, फेरीवाले, फळ भाजी विक्रेते, असंघटित कामगारांचे मंडळ स्थापन करून असंघटित कामगारांना कोविड अनुदान रुपये दहा हजार द्या व त्याचया वाहनाचा विमा एक वर्ष वाढवून द्या, आशा वर्कर व गट प्रवर्तक यांचे थकीत मानधन ताबडतोब दया आणि त्या ना नोकरीत कायम करा, शालेय पोषण आहार कामगारांना नियमीत वेतन / मानधन दया. केंद्रीय किचन पध्दत रद्द करा, इंजिनिअरिंग व फौंडरी कामगारांना कोविड काळातील पुर्ण वेतन द्या, 

 यंत्रमाग, गारमेंट आणि प्रोसेस कामगारांना कोविड अनुदान रुपये दहा हजार आणि कल्याणकारी मंडळ स्थापन करा, आदी मागण्या करण्यात येणार आहेत.

या आंदोलनामध्ये सिटु अंतर्गत लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन, शालेय पोषण आहार संघटना, ऊस तोडणी कामगार संघटना, मेडीकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटना, इंजीनियरिंग कामगार संघटना, लाल बावटा जनरल कामगार युनियन, नगरपालिका कर्मचारी संघटना, साखर कामगार संघटना, किसान सभा, शेतमजूर युनियन, आदी संघटना सहभागी होणार आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय