नंदूरबार (प्रतिनिधी) : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने विविध मागण्यांना घेऊन आज जिल्ह्यातील विरपुर, तसेच मोड येथील सरपंच यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की कोरोनो महामारीचा काळात केंद्र सरकारने घेतलेल्या जनता विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व सामान्य जनतेच्या ज्वलंत मागण्यासाठी आज माकपच्या वतीने देशभरात निषेध करण्यात येत आहे.
आयकर नसलेल्या सर्व कुटुंबांंना पुढील सहा महिने दरमहा ७५०० रुपये रुपये अनुदान मिळावे, माणसी १० किलो मोफत धान्य मिळावे, मनरेगा योजनेतून २०० दिवस काम व ६०० रुपये मजुरी ग्रामीण व शहरी श्रमिकांना मिळावी, सार्वजनिक उद्योगांंचे खाजगीकरण रद्द करास परदेशी व देशी मक्तेदारांना सवलती बंद करा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
विरपुर येथे निवेदन देताना माकपाचे कुमार शिराळकर व उत्तम पवार तर मोड येथे सुदाम ठाकरे, रावा वळवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.