Wednesday, December 4, 2024
Homeकृषीपुण्यात किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तर स्वाभिमानी ने केली शेतकरी कायद्याची होळी

पुण्यात किसान सभेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तर स्वाभिमानी ने केली शेतकरी कायद्याची होळी

पुणे : अखिल भारतीय किसान सभेचे पुणे जिल्हाधिकारी कार्यलयास निवेदन तर स्वाभिमानी शेतकरी संघटने समवेत शेतकरी विरोधी कायद्यांची  होळी करत सरकारचा निषेध केला. विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्र सरकारने नुकतेच कृषी क्षेत्राविषयी तीन कायदे पारित केले आहेत. या कायद्यांना संपूर्ण देशभरातील प्रमुख शेतकरी संघटना विरोध करत आहेत व हजारो शेतकरी विरोध करत आहे. याला विरोध करण्यासाठी आज किसान सभेच्या वतीने निवेदन दिले गेले व यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसमवेत शेतकरी विरोधी कायद्याची होळी करण्यात आली.

 यावेळी कामगार नेते कॉम्रेड अजित अभ्यंकर, राष्ट्र सेवा दलाचे विलास किरोते, DYFI संघटनेचे सचिन देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, युक्रांद चे संदीप बर्वे, सिटू पुणे चे, ऍड.विशाल जाधव व किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय