Sunday, May 19, 2024
Homeकृषीशेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात भारत बंदच्या आंदोलनाचे किसान सभेचे धारूर तहसिलदारांना...

शेतकरी व कामगार विधेयकाच्या विरोधात भारत बंदच्या आंदोलनाचे किसान सभेचे धारूर तहसिलदारांना निवेदन

धारूर  :  केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी बिल संसदेमध्ये चर्चा न करता घाई गडबडीत शेतकरी व कामगार विरोधात निर्णय घेतल्यामुळे आज पुर्ण देशाभर शेतकरी व कामगार केंद्र सरकारच्या विरोधात बंदची घोषणा केली आहे. 

त्या अनुशंगाने महाराष्ट्र किसान सभा व कामगार संघटनेने, शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे मनरेगा मार्फत करा, सर्व पिकाना विमा मंजुर करण्यात यावा, शालेय पोषण आहार कामगारांचे मानधन तात्काळ वापट करा, आयकर लागु नसणाऱ्या सर्व कांमगाराना कोराना काळात ७,५०० रू महिना द्या, लॉकडाऊनच्या काळातील रिक्षाचालक, बांधकांम कामगांर, शालेय पोषण आहार कामगार, आशा, अंगणवाडी, ऊस तोड कांमगार यांना १०,००० रू सानुग्राह आनुदान द्या अशा मागण्यासाठी धारूर तहसिलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी अॅड. संजय चोले, कॉ. काशिराम सिरसट, कॉ. मोहन लांब, डॉ अशोक थोरात, कॉ. मधुकर चव्हाण, जगन्नाथ जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय