Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यकरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणार नाही त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर...

करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणार नाही त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवणार, “या” राज्याने घेतला निर्णय

चंदीगड : पंजाब मधील राज्य सरकारी कर्मचारी जे वैद्यकीय व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणामुळे करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेणार नाही त्यांना १५ सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवले जाणार आहे.

शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की, लसीची प्रभावितता समोर आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. लस सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आणि जे लसीकरण टाळत राहतील त्यांना लसीचा पहिला डोस मिळेपर्यंत रजेवर जाण्यास सांगितले जाईल, असे पंजाब सरकारने घोषित केले आहे.

यासंदर्भातल्या आदेशात असे लिहिले आहे की, “राजकीय पक्षांसह आयोजकांसाठी, उत्सवाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी, व्यवस्थापन आणि कर्मचारी, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील कर्मचारी पूर्णपणे लसीकृत आहेत किंवा कमीतकमी एकच डोस घेतला आहे याची खात्री करणे बंधनकारक आहे.”

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोविड -१९ निर्बंध ३० सप्टेंबरपर्यंत वाढवले ​​आहेत. त्यांनी राजकीयसह सर्व मेळाव्यांमध्ये ३०० व्यक्तींची मर्यादा घातली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय