Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजागतिक मंदीला सुरवात, अमेझॉन 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

जागतिक मंदीला सुरवात, अमेझॉन 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

वॉशिंग्टन : जगप्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी येत्या आठवड्यात 10 हजार कामगारांची कपात करणार असल्याचे कंपनीच्या मानव संसाधन विभागाने जाहीर केले आहे. युरोप अमेरिकेतील संभाव्य अर्थीक मंदीचा फटका कंपनीला बसण्याची शक्यता आहे. कंपनीने 2021 मध्ये 1500 कर्मचारी काढले होते. आताची कामगार कपात कंपनीच्या इतिहासात सर्वात मोठी असल्यामुळे ई – कॉमर्स क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अमेझॉन कंपनीत 16 लाख 8 हजार कर्मचारी आहेत.

अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट, ट्विटर आणि मेटा कंपनीने काही दिवसांपूर्वी हजारो कामगारांची कपात केल्यामुळे जगभर आर्थिक मंदीचा इशारा देण्यात आला आहे.

Lic
जाहिरात 1
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय