Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडअनाथ बाल आश्रमातील बालकांना 'बालदिनानिमित्त' विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

अनाथ बाल आश्रमातील बालकांना ‘बालदिनानिमित्त’ विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने बाल दिनाचे औचित्य साधून ‘स्टुडन्ट वेल्फेअर कमिटी’ अंतर्गत “एक हात मदतीचा ” हा उपक्रम राबविला. यासाठी प्राध्यापक जास्मिन फरास व प्राध्यापक तृप्ती बजाज यांनी पुढाकार घेऊन विकास अनाथ आश्रम चिखली येथे भेट दिली होती.

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या उप प्राचार्य डॉ.वनिता कुऱ्हाडे, समन्वयिका प्रा.सुनिता पटनाईक व प्रा.जास्मिन फरास, प्रा.तृप्ती बजाज, प्रा. समिता शिंदे, प्रा.रघुनाथ ताम्हाणे, प्रा.चिन्मय जैन आणि ११ वी १२ वी चे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

“एक हात मदतीचा निराधारांसाठी” या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांनी धान्य डाळी, अन्य किराणा, शीतपेय, खाऊ आणि अनेक गरजू वस्तू अशा विविध स्वरूपात या अनाथ चिमुकल्यांना मदतीचा हात दिला. या उपक्रमास संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा व प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी प्रोत्साहन दिले.

Lic
जाहिरात 1
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय