Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष : चंद्र किंवा सुर्याभोवती खळे का दिसते?

विशेष : चंद्र किंवा सुर्याभोवती खळे का दिसते?

पृथ्वीच्या वातावरणात वेगवेगळ्या उंचीवर ढग तयार होतात. सर्वात जास्त उंचीवर तयार होणाऱ्या ढगांना cirrus किवा Cirrostratuts ढग म्हणतात. ढग जितके जास्त उंचावर तितके तापमान कमी असते. म्हणून या ढगामधेच अगोदर हिमस्फटिक व नंतर गारा तयार होतात.

या ढगांमधे हिमनगाचे स्फटिक बनायला सुरुवात झाली असेल आणि त्यावेळी आकाशात चंद्र /सुर्य असेल तर प्रकाश किरण पृथ्वीकडे येताना हिमनगाच्या स्फटिकांमधून प्रवास करतात त्यावेळी प्रकाशाचे अपवर्तन व परावर्तन (Refraction and Reflection) या क्रिया घडतात, प्रकाश किरण 22॰ मधे वक्र होऊन पृथ्वीवर पोचतात. त्यामुळे एक वर्तुळकार प्रकाश किरणाची मालिका/साखळी तयार होते. आपण (निरीक्षक) आकाशाकडे पाहताना 22 अंशात वक्र झालेले प्रकाश किरण निरीक्षकाच्या बिंदूवर एकत्र आलेले असतात. त्यातून हे सुंदर दृश्य दिसते.

– हेमंत धानोरकर, खगोल अभ्यासक


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय