Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष : पेरलं तेच उगवलं - अमर मालुसरे

विशेष : पेरलं तेच उगवलं – अमर मालुसरे

देशपांडे अतिशय शिस्तप्रिय होते शिवाय ते गरीबीतून शिकून मोठे सरकारी अधिकारी झाले होते, त्यांचा त्यांच्या गावातील लोकांना सार्थ अभिमान वाटत होता. देशपांडे हे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सहकाऱ्यांशी अगदी प्रेमाने वागत, एक दिवस त्यांच्या वर्गातील सुधीर नावाचा मित्र नवीन घर घेतलं म्हणून पूजेच आमंत्रण द्यायला आला होता. तो सुद्धा सरकारी अधिकारी होता. श्री. देशपांडे व सौ. देशपांडे सुधीरच्या घरी पूजेसाठी जातात घर बघून ते आश्चर्य होतात ते सुधीर विचारतात, “सुधीर हे कसं शक्य आहे? तुझा पगार कमी आहे आणि तू एवढा मोठं घर घेतलं” त्यावर सुधीर म्हणतो की “अरे काही नाही, मलाई फक्त” देशपांडेंना समजल कि नक्की कोणत्या प्रकारे पैसा कमविला होता. देशपांडेंच्या मनात एकाच प्रश्न’ आपण सुद्धा असे केले तर? त्याला काय होत? सर्वच करतात?’ प्रामाणिक नोकरी केली तर फक्त पगार मिळेल पण जर आपण असं केलं तर पैसा, बंगला, गाडी इत्यादी मिळेल. 

देशपांडे सुद्धा सुधीरचे साथीदार झाले होते. आता नवनवीन वस्तू घरात येऊ लागल्या होत्या, ह्याचे सौ. देशपांडेना नवल वाटतं होते, त्यांनी विचारले तर देशपांडेनी सांगितले नाही उत्तर देणे टाळले, पण काही दिवसांनी सौ. देशपांडेना सर्व समजले होते. त्यांना खूप दुःख झाले की ज्या प्रमाणिक नवऱ्यावर प्रेम केले तो आता भ्रष्ट मार्गावर चालत होता. सौ. देशपांडेनी आपल्या नवऱ्याला खूप समजवण्याचे प्रयत्न केले पण त्यांनी काही ऐकले नाही. घरात येणार पैसा हा लक्ष्मी नव्हती तर अवदसा होती कारण कोणाला तरी लुबाडून आणलेली होती. सुनीता व सुजय हे दोन्ही मुलं सुद्धा पैशाच्या आहारी गेले वडीलांकडून मागेल तेवढे पैसे मिळत त्यामुळे दोन्ही मुलं वाईट मार्गाला लागली होती. सुजय तर कॉलेजला गेल्या गेल्या त्याला दारू व सिगारेटचे व्यसन लागले. मुलगी सुद्धा एक टपोरी मुलाच्या प्रेमात पडते खरंतर श्रीमंत बापाची मुलगी म्हणून तो मुलगा तिच्यावर प्रेम करीत असतो. 

सुनीता त्यांच्या प्रियकराला पैसे देत असे, पण जेव्हा सौ.देशपांडना जेव्हा सुजयच्या व्यसनाबद्दल समजले तेव्हा त्यांनी सुजयला खूप समजावले, पण काहीच फायदा झाला नाही मग त्यांनी हे देशपांडेंना सांगितले तेव्हा ते म्हणाले “श्रीमंत बापाची मुलं आहेत, ती थोडी मौज माजा करणारच” असे बोलून मुलांना समर्थन देतात. काही दिवसांनी देशपांडेंना लाच घेताना अटक होते त्यांना व नोकरी जाते त्यात ६ महिन्यांचा तुरुंगवास सुद्धा होतो. त्याच काळात त्याचा मुलगा हा पैशासाठी घरातील दागिन्यांची चोरी करतो तसेच तो बाहेर सुद्धा चोऱ्या करू लागला वारंवार तक्रारी येऊ लागल्या पण याचा सर्व त्रास मात्र सौ. देशपांडेंना होत होता.

देशपांडे हे सतत आजारी असायचे, त्यामुळे ते आता पूर्वी सारखे काम करू शकत नव्हते. त्यांचा गोळ्या औषधांचा खर्च करण्यासाठी आता सौ. देशपांडे छोटे छोटे काम करत असत. पण त्यांनी खर्च भागत नसे शेवटी त्यांनी आपले कर्ज फेडण्यासाठी व इतर खर्चासाठी ते आपलं राहत घर विकतात आणि चाळीत राहण्यास येतात. चाळीत राहणे त्या दोन्ही मुलांना राहणं मान्य नव्हते, ते मात्र आपल्या वडिलांना दोष देऊ लागले होते तेव्हा देशपांडेंच्या लक्षात आले की आपण त्यांना संस्कार देणे गरजेचे होते, पण आता वेळ निघून गेली होती. हे सर्व देशपांडे कुटूंब धक्के सहन करत असतानाच त्यांना आणखी एक धक्का बसतो त्यांचा मुलगा सुजय अति व्यसनामुळे मरण पावतो, हे त्यांच्यासाठी अतिशय दुःखद घटना असते.

मुलगी सुद्धा एका श्रीमंत वृद्ध व्यक्ती सोबत पळून जाते. कारण गरिबीत जगणे तिला मान्य नव्हते, ह्या सर्व घटना एका मागून एक घडत राहतात. पेरलं होतं तेच उगवले होते, देशपांडेंना पश्चाताप करण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. ज्या पैशाचा व पदाचा त्यांना अभिमान होता त्यातलं काहीच नव्हते आता फक्त गरिबी आणि आजारी शरीर फक्त राहिले होते.

✒️ अमर छगन मालुसरे, खोपोली

 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय