Saturday, May 18, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष : पोलीस कर्मचाऱ्याची वारली चित्रकलेतून कोरोनाची जनजागृती ! सर्वांनी पहावे अशी...

विशेष : पोलीस कर्मचाऱ्याची वारली चित्रकलेतून कोरोनाची जनजागृती ! सर्वांनी पहावे अशी चित्रकला

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस गडद होताना दिसत असताना नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, हा संदेश एक पोलीस कर्मचारी आपल्या कलेतून देत आहेत.

कोव्हीडची परिस्थिती असताना आपली ड्युटी बजावत असतानाही नाशिक येथे वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत असणारे रविराज भांगरे वारली चित्रकलेतून जनतेचे प्रबोधन करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील टिटवी गावचे असलेले रविराज भांगरे यांनी समाजासमोर एक वेगळे आदर्श ठेवला आहे. आपले कर्तव्य बजावत असतानाही समाजाप्रती असलेली बांधिलकीही जोपासत आहेत.

ते सुट्टीच्या कालावधीत वेळ मिळेल तसे जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना वारली णित्रकलेच्या मोफत कार्यशाळा घेत असतात. इयत्ता ६ वी मध्ये “‘वारली चित्रकला” हा पाठ असल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना नक्कीच हे उपयुक्त ठरते.

  – रविराज भांगरे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय