सातारा : आशा व गटप्रवर्तक १० मे रोजी दिवसाला ३०० रुपये भत्ता द्यावे, या मागणीला घेऊन राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आशा व गटप्रर्वतक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांनी दिली.
आनंदी अवघडे म्हटल्या की देशभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. हजारो लोक बेड व आँक्सिजन मिळत नाही, म्हणून मृत्यूमुखी पडत आहेत. सरकार सर्व जनतेला घरी बसण्यासाठी लाँकडाऊन करीत आहे, सर्व दुकाने, सेवा बंद करीत आहे. आशांना मात्र गेले वर्षभरापासून एकही दिवस सुट्टी न घेता अहोरात्र कामाला जुंपले आहे, त्यांच्या सुरक्षेची, मानधानाची, त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेची कोणतीही चिंता सरकार करीत नाही.
सरकार आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. याच्या निषेधार्थ आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १० मे रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार असल्याचेही अवघडे म्हणाल्या.