Tuesday, December 3, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : World Autism Day : जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस

विशेष लेख : World Autism Day : जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस

जागतिक ” ऑटिझम” जागरूकता दिवस हा दरवर्षी 2 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणारा दिवस आहे. जो संपूर्ण जगामध्ये ऑटिस्टिक व्यक्ति बद्दल जागृता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) सदस्य राष्ट्रांना उपाययोजना करण्यासाठी प्रोत्साहित करतो.

ऑटिझम (स्वमग्नता ) हा एक प्रकारचा मनोविकार म्हणून ओळखला जातो याचे पूर्ण नाव ” सायको न्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंट डिसऑर्डर” असे आहे, इंग्रजीत याला “ऑटिझम” (Autism) म्हणतात.

ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. स्वमग्नता व ऑटिझम ही जन्म अवस्था आहे तो रोग नाही, याचा शोध लिओकेनर यांनी सन 1943 मध्ये लावला. “फोरम फोर ऑटिझम ” यांच्या सर्वे नुसार 54 मुलांपैकी 1 मुलगा ( स्वमग्न) ऑटिझम असतो. PCMC NEWS

ऑटीझमचे सर्वसाधारण सहा प्रकार दिसतात.
1) क्लासिक ऑटिझम, 2) अस्पर्जर सिंड्रोम, 3)एटीपिकल ऑटिझम 4) चाइल्ड हूड डिसऑर्डर (हेलर सिड्रोम ), 5) सोशल कम्युनिकेशन डिसऑर्डर 6) रेट सिंड्रोम

ऑटिझम स्पेक्ट्रमची लक्षणे

स्वतःमध्ये गुंतून राहतात, भोवतालच्या परिस्थितीचे भान नसतं, एकटे राहणे पसंत करतात, संवाद साधता न येणे, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, बदल स्वीकारत नाही, स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न, दुसऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही, इतर मुलांमध्ये मिसळत नाही, वारंवार सूचना द्याव्या लागतात, हाकेला प्रतिसाद देत नाही. कुतूहल किंवा जिज्ञासा नसते साधारणपणे एक ते तीन वर्षांमध्ये आपणास या मुलांची लक्षणे दिसू लागतात.

ऑटिझमची कारणे व काळजी

ऑटिझम होण्यामागची कारणे खूप आहेत, पण विशिष्ट एकच कारण त्याच कारणीभूत असेल, असे सांगता येत नाही. यामध्ये प्रामुख्याने अनुवंशिकता, 26 आठवड्या पूर्वीचे बाळ, कमी वजनाचे बाळ, गर्भ अवस्थेतील गंभीर समस्या, आईचे वय अधिक असणे, ऑक्सीजन चा अपुरापुरवठा, मेंदूतील संसर्ग अशी अनेक कारणे सांगता येतील.

वयाच्या दोन ते अडीच वर्षांमध्ये निदान झाल्यास ” शीघ्र निदान व शीघ्र उपचार” केंद्रात जाऊन उपचार करून घ्यावेत.डॉक्टर अथवा थेरपीस्टच्या सल्ल्याने योग्य ती थेरपी व औषध उपचार करावा. त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्यांच्यात मिसळून एकरूप होवून गप्पा माराव्यात. त्यांना इतर मुलांमध्ये मिसळून द्यावे. खेळण्यासाठी त्यांना मुभा द्यावी. बौद्धिक विकास करणाऱ्या खेळण्यांचा त्यांना अधिकाधिक वापर करायला द्यावे. मैदानावर मोकळ्या हवेत फिरण्यास घेऊन जावे. स्वतःला इजा करेल अशा धोकादायक वस्तू पासून दूर ठेवावे. PCMC NEWS

ऑटिझमची ट्रीटमेंट

यावर कोणताही ठोस असा उपचार नाही. मुलाची स्थिती आणि लक्षणे लक्षात घेऊन कोणता उपचार घ्यावा हे डॉक्टर ठरवतात.
स्क्रीनिंग टूल्स, बिहेवीयर प्रोग्राम, ॲक्युप्रेशर थेरपी, प्ले थेरेपी, फिजोथेरपी, स्पीच अँड लैंग्वेज थेरपी, वॉटर थेरपी, स्पोर्ट थेरपी म्युझिक थेरपी व औषधी याचा संयोगाने या विद्यार्थ्यांमध्ये काही प्रमाणात बदल घडवता येतो.


काही अभ्यासकांच्या मते ऑटिझम हा जगाला कोड असलेला आणि प्रचंड वेगवाने वाढणारा ऐक रहस्यमय असा विकार आहे. इतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मानाने ऑटिझम विद्यार्थ्यांसाठी खूप कमी प्रमाणात शाळा आहेत, या विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, पालक यांनी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक उन्नतीसाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

या साठी या दोन एप्रिल च्या “ऑटिझम डे “च्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांना या विषयी जागरूक करणे व नवीन पिढीतील तरुण-तरुणीला याविषयी अधिक माहिती देणे अथवा त्यांच्यामध्ये ऑटिझम याविषयी अधिक सखोल माहिती देणे आवश्यक आहे तरच दोन एप्रिल हा दिवस “जागतिक ऑटिझम जागरूकता दिन (Autism awareness day) म्हणून साजरा केल्याचे सार्थक होईल.


जागतिकस्तरावर देखील याबाबतीत गांभीर्याने पाऊले उचलली जात आहेत. या आजाराच्या जागृतीसाठी उपाययोजना लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी जागतिक पातळीवर विविध देशांच्या तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून निर्मूलनाचे भरीव प्रयत्न होत आहेत. अभिसार फाऊंडेशन,वाकड (PCMC) या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र शाळा ऑटिझम ग्रस्त मुलांसाठी सुरू केली आहे.

रमेश मुसूडगे : विशेष शिक्षक, समुपदेशक, म्युझिक थेरपीस्ट
अभिसार फाऊंडेशन, वाकड, पिंपरी चिंचवड
मोबाईल नं :9766053401

शब्दांकन : क्रांतीकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय