Friday, May 3, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत संधी... - डॉ. कैलास व्ही निखाडे

विशेष लेख : आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेत संधी… – डॉ. कैलास व्ही निखाडे

       स्पर्धा परीक्षा ही फक्त हुशार विद्यार्थ्यांसाठी आहे असे नसून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC. तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असते. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात. आज प्रत्येक ठिकाणी स्पर्धला वाव आला आहे. स्पर्धापरीक्षा प्रामुख्याने युपीएससी, एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, शिक्षक भरती, एलआयसी, इत्यादी.  तशा इतर बऱ्याच स्पर्धा परीक्षा असल्या तरी त्या प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो मात्र केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी युपीएससी ही परीक्षा सर्वात महत्त्वाची असते. कारण कमी जास्त प्रमाणात हाच अभ्यासक्रम सर्वात परिपूर्ण सर्वात अवघड म्हणण्यापेक्षा सर्वसमावेशक असा असतो.

       स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून परीक्षेचे स्वरूप समजून घेऊन मागील प्रश्न पत्रिकांचा शक्य तितक्या बारकाईने अभ्यास करायचा पुस्तकांमधून अभ्यास सुरु केलेल्या अभ्यासाचा सराव प्रश्न आणि हळूहळू वेळ लावून प्रश्न पत्रिका सोडविण्याचा सराव करावा. स्पर्धा परीक्षा या प्रशासकीय सेवांशी निगडित असल्या तरी प्रशासनाचा थेट संबंध देशाशी संबंधित असलेल्या प्रश्नांशी, देशविकासाशी, देशसेवेशी असल्याने या परीक्षा अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रशासनप्रणाली देशाच्या न्याय्य समाजिक – आर्थिक विकास व नियोजनबद्ध वाढीसाठी एक चौकट पुरविते. मात्र अजूनही या सार्वजनिक निर्णय प्रक्रियेचा सामाजिक चेहरा पुरेसा प्रातिनिधिक झालेला नाही. अल्पसंख्याक किंवा निरनिराळ्या जातीजमातींचा प्रशासनामध्ये न्याय्य वाटा असणे ही विकासाची व राष्ट्र उभारणीची पूर्वअट नसते. मात्र न्याय्य निर्णय प्रक्रिया ही राष्ट्राची सार्वकालिक गरज असते. त्याच प्रमाणे गडचिरोली जिल्हातील हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर द-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी जवळपास ७६ % टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे भामरागड तहसिल या भागातील विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेच्या तयारी पासून वंचित न राहता स्पर्धा परिक्षेत आदिवासी विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी राजे विश्वेश्वरराव महाविद्यालय, भामरागड मध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करून  प्रा. डॉ. कैलास निखाडे हे स्पर्धा परीक्षा केंद्रप्रमुख असून या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन करून यांच्यात स्पर्धापरीक्षा विषयीची भीती न बाळगता त्यामध्ये यशस्वी होऊन विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे. 

– डॉ. कैलास व्ही. निखाडे

– स्पर्धापरीक्षा केंद्र प्रमुख

– राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड 

– 9423638149, 9403510981

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय