Friday, May 17, 2024
Homeविशेष लेखविशेष लेख : रोजगार हमी योजना आणि ग्रामीण जीवन - लक्ष्मण जोशी

विशेष लेख : रोजगार हमी योजना आणि ग्रामीण जीवन – लक्ष्मण जोशी

“महात्मा गांधी रोजगार हमी योजना” ग्रामीण भागात हा कायदा आणि योजना ग्रामीण विकास आणि रोजगार मिळण्यासाठी ग्रामीण जनतेला वरदान ठरत आहे. रोजगार हमी योजना अशी पहिली योजना आहे या योजनेमुळे महिला आणि पुरुष सारखीच मजुरी मिळते. यामुळे ग्रामीण महिला सक्षमीकरण होण्याचा मार्ग या योजनेमुळे निर्माण झालेला आहे, या योजने अंतर्गत कुटुंबातील दोन व्यक्तीला दिवसाचा 476 मजुरी मिळते आणि महिन्यात 22 दिवस काम तर 10,472 इतकी मजुरी मिळते आणि गावातच रोजगार ही आता हाच प्रयोग किसान सभा जुन्नर तालुका समितीच्या वतीने केला.

आता 120 मजुरांना वृक्ष संगोपन बिहार पॅटर्न नुसार रोज 238 रुपये मजुरी मिळत आहे, या मजुरी रक्कम महिन्याला 7,42,560 रुपये 120 मजुरांना मजुरांच्या खात्यात दर महा जमा होतात. आतापर्यंत मजुरांच्या खात्यात 40 हजार, 30 हजार अशी कामाची मजुरी आत्तापर्यंत मिळाली आहे या मजुरीच्या रकमेइतके ग्रामीण भागातील शेतीचे उत्पन्न सुद्धा नाही.

त्यामुळे ग्रामीण भागात हा कायद्याच्या अंमलबजावणी होणे अत्यंत आवश्यक आहे या योजनेमुळे ग्रामीण भागाचा विकास, महिला सक्षमीकरण, रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबता येईल तर मग बघा विचार करा ग्रामीण भागात जनतेने विचार करावा, सर्व प्रशासनातील अधिकारी, तरुण यांनी विचार करावा आणि गावात रोजगार आणि विकास आणि महिलाना सक्षम करण्यासाठी या योजनेची अंमलबजावणीसाठी योजना समजून घ्या आणि सामील व्हा.

– लक्ष्मण जोशी

– सचिव किसान सभा, जुन्नर

– 9373832598

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय