भारतीय ऊर्जा निर्मितीचा प्रमुख स्त्रोत “कोळसा” अडकला समस्येच्या जाळ्यात !
जनभुमी विशेष लेख : भारत १.४ अब्ज लोकसंख्येचा देश आहे. भारताची ऊर्जेची गरज ही २०२४ पर्यंत सरासरी २३० गिगावॅट पेक्षा अधिक आहे. भारत सरकारच्या ‘एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया २०२४’ रिपोर्ट नुसार २०२२-२३ मध्ये कोळसा वापरून एकुण ऊर्जा निर्मितीच्या ७७.०१% ऊर्जा निर्मिती करण्यात आली. लिग्नाईटच्या मदतीने २.२०% (लिग्नाईट हा सुद्धा कोळशाचा प्रकार आहे. मात्र त्याने थोडं कमी प्रदूषण होतं). क्रूड ऑइल ६.३९%, नॅचरल गॅस ६.८३%, आणि इतर अक्षय उर्जेतून (ज्यामध्ये जलविद्युत, आण्विक, सौर, पवन आणि बायोगॅस ऊर्जेचा समावेश होतो) ७.५८% ऊर्जा निर्मिती होते. याचा अर्थ भारत जिवाश्म ऊर्जा आणि क्षय उर्जेतून ९२.४२% ऊर्जा निर्मिती करतो. भारत कोळशापासून ७९.२१% टक्के ऊर्जानिर्मिती करतो. कोळशाचे ढोबळ मानाने ५ प्रकार पडतात. पिट, लिग्नाईट, सब-बिट्युमिनस, बिट्युमिनस, ऍन्थ्रासाईट. ऍन्थ्रासाईट सर्वात उत्तम कोळसा मानला जातो तर पिट सर्वात वाईट. कारण पिट पासून ऍन्थ्रासाईट पर्यंत कार्बनचे प्रमाण वाढत जाते, आर्द्रता कमी होत जाते आणि हिट कन्टेन्ट म्हणजेच ऊर्जा निर्माण करण्याचे प्रमाण वाढत जाते. म्हणजेच पिट सर्वात जास्त प्रदूषण करतो तर ऍन्थ्रासाईट सर्वात कमी. भारतात ऍन्थ्रासाईट, लिग्नाईट, बिट्युमिनस हे प्रकार आढळतात. ऊर्जा निर्मितीसाठी भारतात सर्वात जास्त बिट्युमिनसचा वापर केला जातो. ऍन्थ्रासाईट भारतात फक्त काश्मीर मध्ये आढळते. Coal crices
आय.क्यु एअर या संघटनेने जगातील ७८१२ प्रदूषित शहरांची यादी जाहीर केली आहे. यात २५६ भारतीय शहरे आहेत. सर्वात १० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील ९ शहरं आहेत. याचं खूप मोठं कारण क्षय ऊर्जेवर असणारे अवलंबित्व आहे. निक्केई इंकॉर्पोरेशन या जपान स्थित कंपनीच्या मालकीचे ब्रिटिश वृत्तपत्र ‘फायनान्शियल टाइम्स’ मध्ये २२ मे रोजी प्रकाशित झालेल्या अंकात ‘अदाणीने कमी दर्जाचा कोळसा उत्कृष्ठ दर्जाचे इंधन म्हणून विकून घोटाळा केला आहे’ या मथळ्याची बातमी केली आहे. यामध्ये अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या अक्षरात ‘भारतात उर्जाक्षेत्राच्या फायद्यापुढे सार्वजनिक आरोग्य दुर्लक्षित केले जात आहे’ असे हायलाईट दिले आहे. या बातमीमध्ये असं म्हणलं आहे की ‘आर्थिक पावत्या असं दाखवतात की जानेवारी २०१४ मध्ये अदानी समूहाने ३५०० कॅलरीज प्रति किलो असलेलं इंडोनेशियन शिपमेंट विकत घेतलं. तेच शिपमेंट नंतर तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कंपनी ‘टॅनजेडको’ ला ६००० कॅलरीज प्रति किलो म्हणून विकलं. म्हणजेच सर्वोत्तम दर्जाच्या कोळशापैकी एक असणारा कोळसा. ट्रान्सपोर्ट कॉस्ट वगळुनही अदानी ग्रुपला यातून दुप्पट फायदा झाला. पुढेही तपासलेल्या कागदपत्रांनुसार २०१४ पासून पुढील २२ शिपमेंट मध्येही तीच पार्टी होती आणि वर लिहिल्याप्रमाणे सर्व घडलं. १.५ दशलक्ष टन्स कोळशाची किंमत अदानीने वाढवल्याचं आढळतं.’Coal crices
या बातमीमध्ये पुढे म्हणलं आहे की हा निकृष्ट दर्जाचा इंडोनेशियन कोळसा अदानी ग्रुप सातत्याने उच्च दर्जाचा कोळसा म्हणून विकत आला आहे. लँसेंटच्या २०२२ च्या रिपोर्ट नुसार भारतात दरवर्षी २ दशलक्ष लोकांचा मृत्यू हवा प्रदूषणामुळे होतो. कोळशाच्या आधारे चाललेल्या पॉवर प्लांट्सच्या आजूबाजूला १०० मैल अंतरापर्यंत लहान मुलांचा मृत्युदर वाढत असलेला दिसतो. विरोधाभास असा की, अदानी स्वतःला अक्षय ऊर्जेच्या बाजारातील मोठा खेळाडू म्हणून उभे करू इच्छित आहेत. याचाच भाग म्हणून अदानी ग्रीनने जगातील सर्वात मोठा ‘ग्रीन एनर्जी पार्क’ तयार करीत आहेत. पाकिस्तानी सीमारेषेजवळ गुजरात मधील ख्वाडा येथे पवन व सौर ऊर्जेचा प्रकल्प अदानी उभा करणार आहेत. अदानी ग्रुप वरील आरोप नाकारत असेल तरीही अदानी भारतातील सर्वात जास्त कोळसा आयात करणारा उद्योग समूह आहे हे विसरून चालणार नाही. ‘इंडियन डायरॉक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’ या भारतीय वित्त मंत्रालयाच्या युनिटने २०१६ साली कोळशाच्या किंमतीबद्दल एक चौकशी समिती निर्माण केली. त्याचा तपास अजूनही चालू आहे. यामध्ये असं आढळून आलं की अदाणींनी कोळशाच्या किंमती तब्बल ६८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे पाच अब्ज सहासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एक हजार चारशे भारतीय रुपयांनी वाढवल्या आहेत.अजून काही कागदपत्रांतून हे समोर आले आहे की डिसेंबर २०१३ मध्ये इंडोनेशियातून ‘एम.व्ही. कालिओपी एल’ हे जहाज २८ अमेरिकन डॉलर म्हणजे २३३२.३७ भारतीय रुपये प्रति टन किंमतीचा कोळसा घेऊन निघाले. ते जहाज भारतात पोहोचल्यावर अदानी कंपनीने तोच कोळसा ९२ अमेरिकन डॉलर म्हणजे ७६६४.४४ भारतीय रुपये प्रति टन या किमतीने ‘टॅनजेडको’ ला विकला. हा निकृष्ट दर्जाचा कोळसा होता. Coal crices
हा कोळसा इंडोनेशिया मधील दक्षिण कालिमंथन येथील ‘पी टी झोनलिन’ या मिनरल ग्रुपच्या खाणीतून येत होता. झोनलिनच्या एक्स्पोर्ट डिक्लेरेशन नुसार टॅनजेडको हा एन्ड बायर होता आणि अदानी इंटरमिडीएटरी म्हणजे मध्यस्थ होता. याच झोनलिनने हाच कोळसा ब्रिटिश व्हर्जीन आयलँड येथील सुप्रीम युनियन इन्व्हेस्टर्सला २८ अमेरिकन डॉलर या किंमतीने विकला आहे. याचा अर्थ अदाणीने किंमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. एक आठवड्यानंतर सुप्रीम युनियन इन्व्हेस्टर्सने अदाणीला सिंगापूरमध्ये ३५०० कॅलरीज पर टन असलेला कोळसा ३४ अमेरिकन डॉलर पर टन किंमतीने अदाणीला विकला. अदाणीने टॅनजेडकोला हाच कोळसा ६००० कॅलरीज पर टन आहे असं सांगून ९२ अमेरिकन डॉलर पर टन या किंमतीला विकला. २०१४ पासून अदाणीने ३२ डिलीव्हरी ६००० कॅलरीज पर टनच्या आहेत सांगून एकूण ९२ अमेरिकन डॉलर पर टन या किंमतीने २.१ दशलक्ष टन कोळसा ‘टॅनजेडको’ला विकला. झोनलिनच्या अंतर्गत रिपोर्ट्स नुसार टॅनजेडकोच्या परचेस ऑर्डर पैकी चोविस कार्गो ऑर्डर्स नुसार मध्यस्थ म्हणून जेव्हा सुप्रीम युनियन इन्व्हेस्टर्सने काम केलं तेव्हा टॅनजेडकोला २८ अमेरिकन डॉलर पर टन दराने कोळसा मिळाला. ऑर्गस या डेटा प्रोवायडर एजेंसी नुसार ४२०० कॅलरिज पर टन कोळसा आहे असं सांगून २२ ते २६ अमेरिकन डॉलर पर टन या किंमतीने विकला आहे.Coal crices
भारतात पाठवलेल्या २४ पैकी २२ शिपमेंटचा डेटा चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की टॅनजेडको एन्ड बायर असून टॅनजेडकोला सरासरी ८६ अमेरिकन डॉलर पर टन रकमेने ६००० कॅलरिज पर टन सांगितलेला कोळसा मिळालेला आहे. ऑर्गसच्या डेटा नुसार ६००० कॅलरिज पर टन कोळशाची त्यावेळी मार्केट प्राईज ८१ ते ८९ अमेरिकन डॉलर आहे. टॅनजेडकोने निकृष्ट दर्जाचा कोळसा त्याच किंमतीत अदानी कडून घेतला आहे. अदानी यांना प्रत्येकी ८६ अमेरिकन डॉलर प्रति टन विकलेल्या कोळशातून ४६ अमेरिकन डॉलर एवढा फायदा झाला आहे. म्हणजे एकूण २२ शिपमेंट्स मधून ७० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा फायदा झाला आहे. टॅनजेडकोला तेव्हा पासून प्रतिवर्षी अब्जावधी रुपयांचा तोटा झाला आहे. याचमुळे ऊर्जेचे दर प्रत्येक वेळी वाढून सामान्य लोकांना त्रास होतो. २०१२ ते २०१६ मध्ये टॅनजेडकोचे ६० अब्ज रुपये निकृष्ट कोळशामुळे वाया गेले. टॅनजेडको तामिळनाडू सरकारची सरकारी कंपनी आहे. यातील ३० अब्ज रुपये अदानी कंपनीमुळे वाया गेले आहेत. भारत चीन नंतर सर्वात जास्त कोळसा उत्पादक व वापरकर्ता देश आहे. त्यामुळे भारताला कोळसा आयात करावा लागतो. इंडोनेशिया भारताचा सर्वात मोठा कोळसा पुरवठादार देश आहे. भारतामध्ये कॅलरिफिक वॅल्यू थर्ड पार्टीज मोजतात. पण यामध्ये मानवी हस्तक्षेप असल्याने असे घोटाळे होतात. Coal crices
सरकारे अदानी सारख्या उद्योगपतींबरोबर संगनमत करून त्यांना फायदा होण्यासाठी प्रयत्न करत असल्याने भारत अक्षय ऊर्जा निर्मितीमध्ये खूप मागे आहे. चीन त्याचवेळी खूप वेगाने आपली सौर ऊर्जा प्रकल्प वाढवत आहे. चीन जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा महाशक्ती बनली आहे. भारत अजून कासवाच्या चालीने प्रगती करतो आहे. राजकारणी आणि अदानी सारख्या उद्योगपत्यांचे हितसंबंध कित्येक जिवांसाठी धोकादायक बनलं आहे. या गोष्टी मान्य न करण्याचा खूप मोठा तोटा भारताला होणार आहे. चीनने २०६० पर्यंत पुर्ण शुद्ध ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे. चीन त्या दिशेने वाटचाल करत आहे. अमेरिकेचं २०७० पर्यंतचं लक्ष तोपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं नाही. हे लक्ष इतकं अवघड आहे. भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशासाठी हे खूप अवघड लक्ष आहे. या गतीने आणि या पद्धतीने ते केव्हाच पूर्ण होणार नाही.
लेखक- सर्वेश सवाखंडे ( विद्यार्थी चळवळीचे नेते )
हेही वाचा :
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन
ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!