Monday, May 20, 2024
HomeNewsस्पार्क फाऊंडेशन-ठाणे यांचा 'अस्मिता' प्रकल्प वाकडपाडा येथे सुरू

स्पार्क फाऊंडेशन-ठाणे यांचा ‘अस्मिता’ प्रकल्प वाकडपाडा येथे सुरू

स्पार्क फाउंडेशन-ठाणे यांचे वतीने वाकडपाडा माध्यमिक विद्यालय येथे मुलींच्या मासिक पाळीच्या काळात उपयुक्त ठरणारे ‘अस्मिता’ यंत्र बसविण्यात आले. हे यंत्र सुलभ पद्धतीने सॅनिटरी पॅड चे वितरण करते तसेच पर्यावरणाची हानी न करता पॅड नष्ट करण्याचे तंत्रज्ञान यात समाविष्ट आहे. या प्रसंगी स्पार्क संस्थेच्या आरोग्य दूत कु.अश्विनी गणपत पिठोले यांनी मार्गदर्शन केले व वाकडपाडा कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्याखात्या कु. सुवर्णा राजाराम शिंदे व कु. सुनीता गोविंद कातवारे यांनी समुपदेशन व प्रशिक्षण दिले.

या औचित्याने नवनिर्वाचित उपसभापती व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रदीप माधव वाघ त्यांनी सांगितले ही मुलींचे आरोग्य हा प्राधान्य क्रमाचा विषय असून अशा प्रकारे यंत्र सर्व शाळा महाविद्यालये याठिकाणी बसविले पाहिजे त्याची सुरुवात वाकपाडा हायस्कूल पासून झाली असुन , स्पार्क फांऊंडेशन च्या सर्व ठिमचे मी आभार मानतो, तसेच स्पार्क फाउंडेशन ला सर्व सहकार्य यापुढे करण्यात येईल.असेही श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले.यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Lic
Lic Kanya Yojana
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय