Friday, November 22, 2024
HomeNewsचिखलीतील सोसायट्यांमधील पाणीपूरवठा सुरळीत करा- टँकर लॉबी व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा...

चिखलीतील सोसायट्यांमधील पाणीपूरवठा सुरळीत करा- टँकर लॉबी व अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा संजीव सांगळे यांचा आरोप

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:चिखली भागातील पाटील नगर,बगवस्ती, देहू-आळंदी रोड वरील सर्वच सोसायट्यांना,तसेच चिखली मधील देहू-मोशी रोडवरील रिव्हर रेसिडेन्सी, ऐश्वर्यम हमारा सोसायटी, क्रिस्टल पर्ल, मिलेनियम पॅरामाऊंट या इतर आजूबाजूंच्या सर्व सोसायट्यांना मागील 15 दिवसांपासून खूप कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.आपल्या फ प्रभागातील पाणीपूरवठा विभागाच्या व पिंपरी चिंचवड मनपातील पाणीपूरवठा विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना याबाबत पाठपूरावा करून देखील कोणतीही सुधारणा झालेली नाही.पुरेशा दाबाने निर्धारित वेळेत पाणी पुरवठा करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देऊन परिसरातील तीव्र पाणी टंचाई दूर करा,अशी मागणी संजीवन सांगळे,अध्यक्ष-चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन यांनी आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

पुढील दोन दिवसात चिखलीमधील सर्व सोसायट्यांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आपल्या पाणीपुरवठा विभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांना गोट्या खेळत बसण्यासाठी गोट्या वाटपाचा कार्यक्रम केला जाईल, तसेच आपल्या कार्यालया समोर आमच्या सर्व महिला महिला भगिनींना घेऊन हंडा मोर्चा काढला जाईल,असा इशारा संजीवन सांगळे यांनी प्रशासनास दिला आहे.

फ प्रभागातील आमच्या सर्वच सोसायट्यांमधील सदस्य प्रामाणिकपणे टॅक्स भारतात. तरी आम्हालाच प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाणी पुरवठा कमीप्रमाणात केला जातो ही खेदाची बाब आहे.

कुठेतरी पिंपरी चिंचवड मनपाच्या पाणीपूरवठा अधिकाऱ्यांची आणि टँकर लॉबीची मिलीभगत यामागे आहे, असे वाटते म्हणूनच कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात आहे.अशी टीका संजीवन सांगळे, अध्यक्ष -चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय