Tuesday, May 7, 2024
Homeकृषीपिक कर्जासाठी किसान सभेचे दुसर्‍या दिवशी तहसील समोर ठिय्या आंदोलन.

पिक कर्जासाठी किसान सभेचे दुसर्‍या दिवशी तहसील समोर ठिय्या आंदोलन.

परळी वैजनाथ : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेत माफी मिळालेल्या व नवीन पात्र शेतकर्‍यांना दत्तक बॅक असलेल्या आयडीबीआय बँकेने तात्काळ पिक कर्ज वाटप करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सोमवार दि 21 रोजी परळी तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे नेते अॅड. अजय बुरांडे, काॅ. बाळासाहेब कडभाने यांनी केले. 

तालुक्यातील वाघाळा, कावळेवाडी, नागपिंपरी, गोपाळपुर व माळहिवरा या गावांना आयडीबीआय बॅक दत्तक बॅक आहे. आयडीबीआय बँकेने युती व आघाडी सरकारच्या काळात मिळालेल्या कर्जमाफी च्या लाभार्थ्यांना कर्ज देण्यास बॅक प्रशासन किरकोळ कारणे देऊन टाळाटाळ करित आहे. कर्जासाठी पात्र असुनही आयडीबीआय बँकेने शेतकर्‍यांना कर्जा पासुन वंचित ठेवले आहे. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य किसानकिसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा सोमवार दि 21 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पहिल्या दिवशी प्रश्न सुटला नसल्याने मंगळवार दि 22 रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. दुसर्‍या दिवशीही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते. दुपारी तीन च्या सुमारास झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी लालबावटा हातात घेऊन आंदोलन सुरूच ठेवले. शासनाने ठरऊन दिलेले पिक कर्ज मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. 

आंदोलनात वाघाळा, कावळेवाडी, नागपिंपरी, गोपाळपुर व माळहिवरा येथील शेतकरी सहभागी झाले आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय