Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणसिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तक उद्यापासून बेमुदत संपावर !

सिंधुदुर्ग : आशा व गटप्रवर्तक उद्यापासून बेमुदत संपावर !

सिंंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन (सिटू संलग्न) ची माहिती  

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. आज आशा व गटप्रवर्तक यांची ऑनलाईन मिटिंग घेण्यात आली. त्यावेळी राज्य कृती समिती व राज्य फेडरेशन यांच्या आदेशानुसार आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 जून 2021 पासून जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक यांनी बेमुदत संपात सहभागी होऊन रस्त्यावरची लढाई सुरू करायचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कॉ. विजयाराणी पाटील व अर्चना धुरी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक 100% या संपामध्ये सहभागी होणार आहेत. तसेच दिनांक 15, 17 व 19 जून रोजी आपापल्या ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.

त्याचबरोबर पुढील आठवड्यात राज्य कृती समिती व राज्य फेडरेशन यांच्या आदेशानुसार एकाच दिवशी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एक मोठे आंदोलन सुद्धा केले जाणार असल्याचे पाटील म्हणाल्या.

■ संपाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

1. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या.

2. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या.

3. आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या.

4. आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख व इतर मागण्यांसाठी हा संप होत आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय