Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्री ज्ञानेश्वर विद्यालयात श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी

आळंदी / अर्जुन मेदनकर : देशाचा आधारस्तंभ असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाची अव्याहत चालत आलेली परंपरा व संस्कृतीचे संस्कार रुजवण्यासाठी व एक चांगले व आदर्श जीवन जगण्यासाठी तसेच आपला आदर्श येणाऱ्या पिढीसमोर ठेवण्यासाठी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था समवेत अन्य 33 शाळांमध्ये ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार’ यांच्या वतीने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ एक संस्कारक्षम उपक्रम यांच्यामार्फत ग्रंथराज ज्ञानेश्वरी या जीवन ग्रंथातील ज्ञानरस दिला जातो. जेणेकरून हा संसार यज्ञ सुरळीत चालू शकेल. म्हणून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ हे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगपती पराग इनामदार यांच्या सहकार्यातून २५० ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात आले. Shree Dnyaneshwari Jayanti was celebrated with enthusiasm in Shree Dnyaneshwar Vidyalaya

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह. भ. प. संग्राम बापू भंडारी महाराज, कुलस्वामिनी पतसंस्थेचे संचालक निलेश बोरचटे, कुलस्वामिनी पतसंस्थेचे सल्लागार प्रकाश पानसरे, इंद्रायणी शिक्षण संस्थेचे संचालक तुकाराम गवारी, अंकुश बोडके समवेत संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, चांगदेव वाकडकर, अविनाश पारखी, सागर वहिले, समाधान वहिले, हेमांगी कारंजकर, प्रकाश भागवत, अमीर शेख, शिक्षेकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, चरित्र समितीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये दीपक मुंगसे यांनी श्री ज्ञानेश्वरी जयंती विषयी माहिती देत सांगितले की मूळ स्वरूपातील ज्ञानेश्वरी ग्रंथाचे संशोधन करून श्री संत एकनाथ महाराज यांनी मूळ शुद्ध स्वरूपात पूर्ण केला तो भाद्रपद वद्य षष्ठी दिवस ज्ञानेश्वरी जयंती दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तदनंतर अजित वडगावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून ज्ञानेश्वरी ही जीवनदायींनी असून कोरोना काळात स्वतः करुणाग्रस्त असताना ज्ञानेश्वरी वाचन केले त्याचे फळ म्हणून त्यांना सुदृढ जीवन मिळाले असा स्वतःचा अनुभव सांगून सर्वांनी आपले जीवन सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरी पारायण करणे व ज्ञानेश्वरीतील ओवी आचरणात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. व सर्वांना ज्ञानेश्वरी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तुकाराम गवारी यांनी प्रामाणिकपणे कर्म केल्यास त्याचे फळ आपणास मिळणारच असे सांगून सर्वांनी ज्ञानेश्वरी रुपी ज्ञानप्रसादाचा सर्वांनी आपल्या जीवनात उपयोग करावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी संग्राम बापू भंडारी यांनी मानवी जीवनात ग्रंथाचे महत्व सांगून प्रत्येकाने ग्रंथांशी नाते जोडून आपले जीवन आनंदमय व यशस्वी करावे. तसेच ग्रंथप्रेमी महामानवांनी आपले जीवन सार्थक करून देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ग्रंथाचे महत्व लक्षात घेता ग्रंथाचे वाचन करून आपल्या संस्कृतीचे जतन करावे तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे शिक्षण देण्यास अग्रगण्य असणारी संस्था श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था तसेच विद्यार्थ्यांसाठी ज्ञानेश्वरीचे शिक्षण देण्यासाठी कार्यरत असणारे संस्था संचालक अजित वडगावकर, प्रकाश काळे, लक्ष्मण घुंडरे, दीपक मुंगसे आदींचे कौतुक करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय