Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

शिवसेनेला मोठा धक्का बसला, आदित्य ठाकरेंसह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई ?

मुंबई : रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. ही निवडणूक भाजपने जिंकली असून राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले आहेत. तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मत पडले असून त्यांचा पराभव झाला. शिवसेनेला हा पहिला धक्का बसला असताना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आली असून गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच राहणार आहेत. यासंदर्भात विधीमंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत माहिती दिली आहे.

---Advertisement---

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक आमदार बंड करून सुरत, गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले. या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवत त्यांच्याजागी आमदार अजय चौधरी यांची गटनेते म्हणून नियुक्ती केली होती. तसेच विधिमंडळाच्या मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर राज्य विधिमंडळाने देखील अजय चौधरी यांच्या गटनेते पदी अधिकृत नियुक्ती करण्याच्या विनंतीला मान्यता दिली होती. मात्र, राज्यात शिंदे सरकार सत्तेवर येताच शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची मान्यता रद्द करण्यात आल्याने माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत शिवसेनेच्या १६ आमदारांची आमदारकी धोक्यात आली आहे.

शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांची मान्यता रद्द करून त्याजागी पुन्हा एकनाथ शिंदे यांची गटनेते म्हणून नियुक्ती कायम ठेवली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे सुनील प्रभू यांचंही मुख्य प्रतोदपद रद्द करण्यात आलं असून शिंदे गटाकडून मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिवालयचे शिवदर्शन साठ्ये यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles