Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणशिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी - खासदार संजय राऊत

शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी – खासदार संजय राऊत

आंबेगाव तालुका शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांना केले मार्गदर्शन

आंबेगाव / रफिक शेख : पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तेव्हा बैलगाडा विषय मार्गी लागलेला असेल. कोर्ट काय म्हणत, कायदा काय म्हणातो यापेक्षा शिवसेना काय म्हणते हे महत्त्वाचं आहे. मेनका गांधीला इथे बोलावून बैलगाडा मालकांची ताकद काय असते ते एकदा दाखवून देऊ असे ठणकावून सांगत शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे शिवसेना नेते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आंबेगाव तालुका शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट केले. मोरया मंगल कार्यालय वडगाव फाटा येथे शिवसैनिकांचा मेळावा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

हे वाचा ! संजय राऊतांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर, आळेफाटा येथे शिवसेनाचा मेळावा संपन्न

यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, जरी मी खासदार नसलो तरी मी खासदार असताना सरकार दरबारी जेवढी ताकद होती तेवढीच आजही आहे. शिवसेना पक्ष व मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे. त्यामुळे शिवसैनिकांची कामे अडत नाही. विकास कामांसाठी सातत्याने माझे प्रयत्न सुरुच आहेत. त्यामुळे केंद्रीय वर्ग निधीतून 5 कोटी रुपये तर ग्रामीण विकास निधी व इतर योजनेतून 3 कोटी रुपयांची कामे वर्षभरात मंजूर करून आणली आहे. एका पराभवाने खचून न जाता आपल्याला पुन्हा नव्या ताकतीने उभं राहायचं आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाला न्याय देऊन पक्ष देईल ती जबाबदारी व कामे नेटाने पार पाडावीत असे यावेळी आवाहन केले. 

हे पहा ! आंबेगाव : आदिवासी ठाकर समाजातील युवक – युवतींना जातीचे दाखले वाटप

शिवसेना उपनेते, माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी आपल्या तडाखेबाज शैलीने शिवसैनिकांना चेतविले व शिवसेनेचा भगवा आंबेगाव तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत डौलाने फडकला पाहिजे, यासाठी कामाला लागा असे आवाहनही केले.

हे वाचा ! पुणे : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची महिला सरपंचाला मारहाण


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय