Friday, May 17, 2024
HomeNewsPCMC:शिवतेजनगर,चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती साजरी

PCMC:शिवतेजनगर,चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती साजरी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.१९-श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान च्या वतीने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली.त्यावेळी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा हरिनारायण शेळके, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य कल्याण वाणी, महिला भजनी मंडळ अध्यक्षामनीषा देव,श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या कार्याध्यक्षासारिका रिकामे,श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळ अध्यक्षा क्षमा काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संस्थापक अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कार्याध्यक्ष सारिका रिकामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इंग्लिश मध्ये अध्यक्ष प्राध्यापक हरिनारायण शेळके सर यांनी शिवाजी महाराजांनी आपल्या चातुर्य कौशल्याने गडकिल्ले कसे काबीज केले ह्यावर मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले,वाणी सरांनी रामायण महाभारताचे दाखले घेऊन शिवाजी महाराजांनी त्याचा स्वराज्य निर्माण करण्यात कसा योग्य प्रकारे नियोजन केले, ह्याबद्दल थोडक्यात माहिती दिली.
तसेच प्रतिष्ठान चे अध्यक्षनारायण बहिरवाडे यांनी शिवाजी महाराजांनी स्रीयांचा आदर करावा मग कोणत्याही जाती धर्माची असो, जो स्त्रीयांचा अनादर करेल त्याला योग्य ती शिक्षा देऊन शिवाजी महाराजांनी आपल्या समोर जो आदर्श निर्माण केला त्याविषयी माहिती दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय