जुन्नर : आज जुन्नर मध्ये स्टुडंन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) जुन्नर तालुका समितीच्या वतीने कॉम्रेड प्रभाकर संझगिरी स्मुर्ती भवन बेळेआळी जुन्नर येथे शहीद भगत सिंग यांची 113 वी जयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी डीवायएफआयचे तालुका सचिव गणपत घोडे यांनी शहीद भगत सिंग यांचे थोडक्यात विचार सांगत सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांवर टीका केली. तसेच तरुणांनी भगत सिंग यांचे पुस्तके वाचावे असे आवाहन केले.
यावेळी डीवायएफआयचे तालुका सचिव गणपत घोडे, एसएफआयचे माजी तालुका अध्यक्ष अक्षय निर्मळ, तसेच किसान सभा पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, किसान सभा जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, तसेच आंबे पिंपरवाडीचे सरपंच मुकुंद घोडे, दिपक लाडके आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.