Saturday, May 18, 2024
HomeNewsSFI चे घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच मुक्काम आंदोलन सुरू, 'या' आहेत मागण्या

SFI चे घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येच मुक्काम आंदोलन सुरू, ‘या’ आहेत मागण्या

घोडेगाव : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव चे प्रकल्प अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मुक्काम आंदोलन सुरू केले आहे. वेळोवेळी आंदोलन करून, निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याने एस एफ आय च्या वतीने हा आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी यांनी दिली.

नागापूर पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र तत्काळ सुरू करा, वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा, आदिवासी वसतिगृहातील पायाभूत सुविधांची पूर्तता करा, आदिवासी वसतिगृहातील व्यवस्थेचा दर्जा सुधारा आदींसह मागण्यांसाठी हे मुक्काम आंदोलन सुरू आहे.

जोपर्यंत मागण्यांवर तोडगा निघणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिलं असेही सांगण्यात आले आहे. या आंदोलनाला एस एफ आय चे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी, राज्य समिती सदस्य रूपाली खमसे, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वालकोळी, योगेश हिले, रोहिदास फलके आदींसह विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

Lic

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय