Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडSEXTORTION-एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत...

SEXTORTION-एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

विशेष रिपोर्ट – क्रांतीकुमार कडुलकर, मुक्त पत्रकार – पिंपरी चिंचवड

इंटरनेट, व्हाट्सॲप्स ,फेसबुक याद्वारे सायबर गुन्हेगारी खूप वाढली आहे,व्हिडीओ कॉल करून काही तरुण मुली हनी ट्रॅपच्या जाळ्यात काही नागरिकांना ओढत असतात. काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाला सेक्सटॉर्शनमधून ४ लाख ६६ हजार रुपयांना लुबाडल्याचे प्रकरण समोर आले आहे. पुणे पोलिसांनी राजस्थानमधील दोन टोळ्यांना अटक केली आहे.

२०२२ मध्ये १४०० गुन्हे पुणे पोलिसात दाखल झाले आहेत.लैंगिक व्हिडीओ कॉलिंग द्वारे सापळा रचून महाविद्यालयीन युवक, चाळीस वयोगटील व्यावसायिक, निवृत्त व समृद्ध वर्गातील जेष्ठ नागरिक यांना सोशल मिडियाच्या (व्हाट्सॲप,फेसबुक,डेटिंग ॲप्स) मार्फत टार्गेट केले जाते. तुमचे फेसबुक प्रोफाईल, स्टेटस वरून हे गुन्हेगार शिकार जाळ्यात ओढतात.



नोकरी व्यवसाय आवरून सर्वसाधारण व्यक्ती घरी रिलॅक्स मूढ मध्ये बसलेला असते.अंगावर घरातील साधे कपडे उदा.बर्म्युडा टी शर्टवर असताना काही हाय, हॅलो मेसेज येतात.तो नंबर त्या व्यक्तीच्या नेहमीच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये नसतो. ‘हाय’ ला प्रतिसाद देऊन ‘हॅलो’ असे उत्तर दिले जाते.

डीपी मध्ये एक सुंदर ललना असते.त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ती मेसेज करते, फ्रेंडशिप मागते.आंबटशौकीन लोकांना अशा मुलींच्या दररोजच्या मेसेजमुळे ‘वेगळा’ आनंद मिळतो.एकदा फ्रेंडरिक्वेस्ट पाठवली की,दोस्ती बढ जाती है. चॅटिंग सुरू होते, ती कुठेतरी ऑनलाईन मार्केटिंग कंपनीमध्ये जॉब करत असते.वो बोलती है, बुलाती है, आंबटशौकीन लोकांना ऑनलाईन मैत्रिणी आवडत असतात.पण ती एका संघटित सायबर क्रिमिनल गॅंग मधील एक सुपर डूपर सदस्य असते, हे कळायला खूप उशीर झालेला असतो.आता इतके दिवस चॅटिंग करून बोअर झालेला ‘तो’ तिच्या दर्शनाची वाट बघत असतो.

आणि तिचा व्हिडीओ कॉल येतो

ऑनलाईन फ्रेंड्सशिपच्या या जमान्यात शेकडो हनीट्रॅप डिजिटल दुनियेत आहेत. प्रत्यक्ष कधीच न पाहिलेल्या सुंदर मुली, महिलांची भुरळ पडते, तारतम्य नसल्याने मैत्री सुरू होते. स्वतःचे खाजगी आयुष्य तिच्यासमोर व्यक्त केले जाते.एक दिवस सायंकाळी ती त्याला व्हिडीओ कॉल करते आणि वैयक्तिक गप्पाटप्पा सुरू होतात. ती स्वतः वैयक्तिक लैंगिक दृश्ये( NUDE) दाखवत असते, त्याचवेळी तिकडून एक कॅमेरा त्याला शूट करत असतो. इथे चाळवलेल्या भावनेच्या भरात ती त्याला कपडे काढायला लावते, हे व्हिडीओकॉल सुरू असताना हनीट्रॅप मध्ये गुंतलेल्या माणसाला पूर्ण संमोहित केले जाते. तिच्यासमोर काढलेले कपडे, देहबोली, देहभाव याचे व्हिडीओ त्याला पाठवले जातात. ते नग्न व्हिडीओ पाहून त्याची धुंदी उतरलेली असते. इथून खंडणी मागायला सुरवात होते.



इथून सुरवात होते,सेक्सटोर्शनच्या सापळ्याची

तिचे येणारे मेसेज धमकी देत असतात, यू ट्यूबवर व्हिडीओ लोडिंग करून पॉज केलेला स्क्रीनशॉट येतो. तुमच्या फेसबुकवर, पॉर्न साईटवर हा व्हिडीओ नको असेल तर खंडणी मागितली जाते. एक पत्रकार म्हणून मी अशा हनी ट्रॅपच्या शोधात होतो. सप्टेंबर २०२२ मध्ये सायंकाळी पिंकी शर्मा नावाच्या तरुण महिलेचा व्हाट्सॲप एक मेसेज आला, मी नेहमी सायंकाळी न्यूज एडिटिंग ,लोडिंग करत असतो. पत्रकार म्हणून असे नंबर कोणाचे असू शकतात, याची मला माहिती होती.आणि मला सोशल मीडिया, सेक्स आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांनी ३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या सेक्सटोर्शन टोळीला डिसेंबर २०२१ अटक केली होती. तसेच देशाच्या विविध राज्यात सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी पकडल्याच्या बातम्या येत होत्या.

दिल्लीतील एका त्रस्त नागरिकाने व्हिडीओ सार्वजनिक होऊ नये म्हणून दीड लाख रुपयांची खंडणी दिली होती व त्याला अजून ३ लाख रु मागितले जात होते. डिसेंबर २०२१ मधील ही घटना आहे. त्यावेळी भाड्याच्या फ्लॅटमधून सेक्सटोर्शन रॅकेट चालवणारी ही गॅंग दिल्ली पोलिसांनी पकडली होती. एकूण या सेक्सटोर्शन टोळीच्या हनी ट्रॅप मध्ये खूप लोक सापडले होते. ऑनलाईन पैसे पाठवूनही व्हिडिओ डिलीट केले जात नव्हते, त्यामुळे काही जणांनी आत्महत्या केल्या होत्या. शोध पत्रकारिता जागृत असेल तर हे नेमके काय आहे, हे समजून येते.त्या पिंकी शर्मा नावाच्या मुलीचे भावना चाळवणाऱ्या अश्लील व अनैतिक चॅटिंगचे आलेले सर्व मेसेज म्हणजे एक ट्रॅप होता. तिच्या प्रत्येक मेसेजला मी प्रतिसाद देत गेलो. त्याचे स्क्रीनशॉट सेव्ह केले.



नंतर तिने व्हिडिओकॉलला सुरवात केली. मी जाणीवपूर्वक माझा व्हिडीओ काढू दिला ,त्या टोळीने तो व्हिडीओ अपलोड करण्याची धमकी दिली. ते सर्व एकूण रेकॉर्ड मी सेव्ह करत होतो, आजही ते माझ्याकडे आहे. परंतु मी कोण आहे, याची त्यांना माहिती नव्हती .अनेक फेक कॉल येत होते. शेवटी मी त्या महिलेला व संबंधित गॅंग लीडरला माझी रिपोर्टर म्हणून ओळख सांगितली, तुम्ही ते व्हिडीओ इंटरनेटवर बिनधास्त अपलोड करा असा मी उलटा दम भरला, त्यानंतर त्या पिंकी शर्मा स्वतःहून ब्लॉक झाल्या.

इज्जत का फालुदा’ नको म्हणून खूप लोक मनी ट्रान्सफर करून मानसिक शांती हरवून बसलेले असतात.सामाजिक प्रतिष्ठा, कौटुंबिक भयामुळे हनीट्रपमध्ये सापडलेले लोक भीषण तणावाखाली असतात, काही आत्महत्या करतात.

डेटिंगॲप्स, डेटिंगसाईट, फेसबुक, व्हाट्सॲप याद्वारे सायबर गुन्हेगार सुसंघटीतपणे लूटमार करत आहेत. व्यक्ती कोणाशी चॅटिंग करत आहे, काही गरज नसताना केलेला टाइमपास त्या व्यक्तीच्या जीवनाचा फास ठरू शकतो.उगाच ऑनलाईन सौंदर्याच्या मृगजळात फसू नका. कोणी फसले असेल तर पोलिसांकडे जा. जिवलग मित्रांना याची माहिती द्या. सायबर सेलमधील पोलीस अधिकारी तक्रार नोंद होत नाही, तोपर्यत मदत कशी करणार? कारण प्रताडीत व्यक्ती गुन्हेगार नसते. सतत अनोळखी न्यूड मेसेज, न्यूड व्हिडीओ कॉल येत असतील तर ते ब्लॉक करा. लुटले जाल, अन्यथा आयुष्य बरबाद होऊ शकते.


२००० ते २००३ या काळात पिंपरी चिंचवड शहरातील सायबर कॅफेमध्ये मधील खुले आम ओपन असलेल्या अश्लील वेबसाईटचा तपशील अभ्यासून यावर निर्बंध घालावेत या साठी मी माहिती प्रसारण मंत्री सुषमा स्वराज यांना विशेष निवेदन पाठवले होते. त्या काळात केंद्रसरकरने २००० मध्ये सायबर सुरक्षा व हॅकिंग, डेटा चोरी ई गुन्ह्याबद्दल पोलीस कारवाई साठी तरतुदी केल्या आहेत. केंद्र सरकार या कायद्यात काळानुसार विशेष कठोर शिक्षेची तरतूद करेपर्यंत डिजीटल माध्यमक्रांतीतील उपयुक्त व उपलब्ध साधनांचा सकारात्मक कारणासाठी वापर केल्यास पोलीस यंत्रणेवर ताण येणार नाही.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय