मुंबई : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. दुपारीच अधिवेशनाच काम तहकूब करण्यात आलं असून विरोधकांनी पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नुकताच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला.
उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ठाकरे यांना धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांच्या अडचणीत वाढ होतना दिसत आहे. विरोधकांनी नीलम गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला.
विधान परिषदेचं कामकाज सुरू होताच शेकापचे जयंत पाटील यांनी थेट गोऱ्हे यांच्यावरच आक्षेप घेतला. यावेळी त्यांनी, सभापती महोदया तुमच्यावर आक्षेप आहे म्हणत, ज्या या पदावर बसल्या त्यावेळी त्यांचा पक्ष संपला, पक्ष सदस्यत्व जातं असं म्हणत त्यांनी आक्षेप घेतला.
या आक्षेपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, असे कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. नियमांमध्ये बसत असेल तरच आक्षेप घेता येतो. त्यामुळे हा आक्षेप घेता येणार नाही.
दरम्यान, होणाऱ्या गोंधळामुळं तुम्हाला माझ्याविरोधात आक्षेप घ्यायचा असेल तर घ्या अशी भूमिका नीलम गोऱ्हे यांना घ्यावी लागली.
नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाकडून आज राज्यपालांची देखील भेट घेण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहून योग्य न्याय करू शकत नाही, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी मविआच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा :
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान
धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या
‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 133 पदांची भरती; आजच करा अर्ज