नाणेघाट : नाणेघाट परिसराला पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली आहे, खोल दरी धुक्याच्या विविध छटा, धबधबे तसेच अंगाला स्पर्श करणारा गार वारा या निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांचा आनंद घेत शनिवार दि.१६, व रविवार दि.१७ वीकेंड सुट्टीच्या दिवशी पर्यटकांनी पावसाळी पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटला.
घाटघर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने सुरु केलेल्या उपद्रव शुल्क नक्यावर बाहेर गावाहून आलेल्या १०९२ दुचाकी व ८५६ चारचाकी वाहने आशा एकूण १९५० वाहनांची नोंद झाली आहे. या दोन दिवसांत तब्बल ६६५६ पर्यटकांची नोंद झाली. त्यांच्याकडून ६६,५७० रुपयांचे उपद्रव शुल्क वसूल करण्यात आले. यातुन स्थानिकांनी रोजगानिर्मिती, परिसरातील जैवविधता जोपासली जावी तसेच परिसर प्लास्टिक मुक्त परिसर ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जाणार असल्याचे वनक्षेत्रपाल प्रदिप चव्हाण यांनी सांगितले.
घाटमाथ्यावर पाऊस हा दमदार सुरु असल्याने तर माळशेज घाटात पर्यटनासाठी बंद केल्याने नाणेघाटात पर्यटकांची संख्यावाढली तसेच ब्रिटीश कालीन बंधारा, ओढे, धबधबे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. या वाहणाऱ्या पाण्यात बसुन पर्यटकांनी वर्षाविहरसाचा आनंद लुटला. तर अनेक ठिकाणी वाहनाच्या गर्दी तसेच अरुंद रस्त्यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
परिसरातील पर्यटकांची वाढती संख्या यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा ही व्यवसाय चांगला झाला. नाणेघाट (घाटघर), (आंबोली) दाऱ्याघाट, प्रसन्नगड (चावंड), कांचन धबधबा (हातविज), जुन्नरतालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यटस्थळांवर मागील काही वर्षांपासून पर्यटकांचा ओघ वाढला आहे
हे ही वाचा :
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान
धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या
‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती