Sunday, May 19, 2024
Homeबॉलिवूडज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे निधन

पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते श्रीकांत मोघे निधन झालं,  ते 91 वर्षांचे होते. श्रीकांत मोघे यांनी आपल्या कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त नाटकं, तर 50 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

उंबरठा, दोन्ही घरचा पाहुणा, सिंहासन, वासुदेव बळवंत फडके या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश होतो. तसंच ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील त्यांची भूमिकाही अत्यंत गाजली होती.

श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ‘नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. श्रीकांत मोघे यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झालं. पुढे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते पुणे आणि मुंबई येथे गेले.

शाळकरी वयापासूनच श्रीकांत मोघे हे नाट्य-अभिनयाकडे वळले. श्रीकांत मोघे हे मराठी कवी सुधीर मोघे यांचे मोठे भाऊ होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय