Sunday, May 19, 2024
Homeराज्य‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची...

‘या’ तारखेला वाजणार शाळेची घंटा, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आटोक्यात आलेली कोरोनाची रूग्ण संख्या आता पुन्हा वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्याचा नवीन आकडा समोर येत आहे. त्यामुळे यंदा शाळा सुरु होणार कि नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.

राज्यातील कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत असताना शाळा सुरु होण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. उन्हाळी सुट्यानंतर आता राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरु होणार आहे. 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा 15 जूनला सुरू होणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ‘राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळेत SOP चालू करण्यात येईल. मागील २ वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी काही योजना नियम आखणार आहोत. बारावीच्या निकालासंदर्भात बोलताना त्यांनी बारावीचा निकाल लवकरच लागेल असे सांगितले.

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय