Tuesday, May 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडभोसरी येथे १०० वृक्षांची लागवड करून संगोपनासाठी राबविली दत्तक वृक्ष योजना

भोसरी येथे १०० वृक्षांची लागवड करून संगोपनासाठी राबविली दत्तक वृक्ष योजना

पुणे : सध्या पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे महत्व समजू लागले आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नारायण हट शिक्षण संस्था, नारायण हट गृह संस्था, भूगोल फाउंडेशन भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने १०० देशी वृक्षांची लागवड केलेल्या वृक्षांच्या संगोपनासाठी दत्तक वृक्ष (वृक्षसंवर्धन पालकत्व) योजना राबविली.

जागतिक पर्यावरण दिनाचे ‘औचित्य साधून भोसरी येथील नारायण हट शिक्षण संस्थेच्या प्री- प्रायमरी शाळा क्रीडांगण परिसरात १०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमध्ये फळझाडे, आयुर्वेदिक झाडे, पर्यावरण पूरक झाडे, लागवड करण्यात आली असून वड, पिंपळ, चिंच, उंबर, आंबा, फणस, पेरू, जांभूळ, सोनचाफा, अडुळसा, बकुळ, रामफळ, नारळ, कवट, सिताफळ, बोर, अर्जुन, कडूनिंब या जातीच्या झाडांना प्राधान्य देण्यात आले आहे.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राज्य अधिवेशन सातारा येथे उत्साहात संपन्न, नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर


सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

केवळ झाडे लावून उपयोग नाही तर त्यांचे संगोपन पर्यावरणाच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे. यासाठी सदर उपक्रमात दत्तक वृक्ष (वृक्षसंवर्धन पालकत्व) ही संकल्पना स्वीकारण्यात आली. त्यानुसार शाळेत प्रवेश घेतलेल्या मुलांच्या पालकांनी झाडांचे संगोपन व सोसायटीतील सभासदांनी झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी वाटून घेतली आहे. प्रत्येकाने स्वतः लागवड केलेल्या एक झाडाचे संगोपन वर्षभर करून त्यांचा पुढील वर्षी वाढदिवस साजरा करण्याचे यानिमित्ताने ठरवले आहे. या कार्यक्रमासाठी सोसायटीचे सभासद, संचालक, शिक्षण संस्थेचे संचालक, भूगोल फाऊंडेशनचे सभासद, शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वृक्षलागवड कार्यक्रमाचे संयोजन अंकुशराव गोरडे, रोहिदास गैंद, शिवराम काळे, डॉ. वसंतराव गावडे, डॉ‌ बाळासाहेब माशेरे, विठ्ठल वाळुंज साहेब, साहेबराव गावडे, कर्नल तानाजी अरबुज, अनिल घाडगे, राजेंद्र ठाकूर, मनोज माकुडे, शशिकांत वाढते, अक्षय पोटे, अनिल पवार, ज्योती दरंदले, शोभा फटागडे, शीला इचके, मीना आखाडे, ज्ञानेश्वर सावंत, यशवंत नेहरे, डॉ. सुरेश पवार, संजय सांगळे, शोभा आरुडे, रोहिणी पवार, उज्वला थिटे, आणि भूगोल फाउंडेशन भोसरी यांनी केले, तसेच मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले. या वृक्षांसाठी विद्यार्थ्यांचे पालक नितीन बागुल यांनी खत उपलब्ध करून दिले.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल वाळुंज यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी केले तर आभार संदीप बेंडुरे यांनी मानले.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यांत 145 पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय