सातपूर (नाशिक) : सीटू यूनियन, किसान सभा व महाराष्ट्र शेतमजूर युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार, शेतकरी, शेतमजूर परिषद आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ४) सीटूभवन, खुटवडनगर येथे सकाळी ११ वाजता ही राज्यस्तरीय परिषद होणार असल्याची माहिती सीटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किसान सभेचे अखिल भारतीय महासचिव कॉ. विजू कृष्णन, शेतमजूर युनियनचे अखिल भारतीय सचिव कॉ. विक्रम सिंग परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉ. जे. पी. गावित, राज्याध्यक्ष उमेश देशमुख, सीटूचे राज्य उपाध्यक्ष नरसय्या आडम मास्तर, राज्य सरचिटणीस एम. एच. शेख, शेतमजूर युनियनचे राज्याध्यक्ष बळीराम भुंबे, राज्य सरचिटणीस मारुती खंदारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून देशव्यापी आंदोलनाबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान यावेळी राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे.