Home ताज्या बातम्या Sanjog Waghere : मावळमध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावू

Sanjog Waghere : मावळमध्ये संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावू

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिका-यांनी दिला विश्वास

उरण, पनवेल, कर्जत-खालापूर विधानसभेच्या बैठकीत सविस्तर चर्चा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदारसंघतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उरण, पनवेल, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. (Sanjog Waghere)

त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयासाठी ताकद लावू, असा विश्वास सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला.

कर्जत येथे पार पडलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) रायगडचे प्रभारी प्रशांत पाटील, महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल पाटील, महिला अध्यक्ष दीपिका भांडारकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी, राष्ट्रवादीचे( शरद पवार गट) पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील, महारष्ट्र प्रदेश सरचिटणीस फारुख पटेल, युवक अध्यक्ष शाहबाज पटेल यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Sanjog Waghere)

देशात काँग्रेस नेते राहूल गांधी, तर महाराष्ट्रात शरद पवार आणि उध्दव ठाकरे समविचारी पक्ष, संघटना यांना सोबत घेऊन भाजपविरोधात लढा देत आहेत.

त्यांची ताकद वाढविण्यासाठी, तसेच महाराष्ट्राच्या हितासाठी आगामी लोकसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, त्या करिता इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे पाटील यांचे नाव आणि मशाल हे चिन्ह मतदारापर्यंत पोहोचविण्याचे काम करू. त्यांना मावळमध्ये विजयी करण्यासाठी आमचा संपूर्ण पक्षाची ताकद त्यांच्या पाठिशी उभा करू, असे प्रमुख पदाधिका-यांनी नमूद केले.

कर्जत-खालापूरमध्ये गावोगावी संजोग वाघेरेंचे जोरदार स्वागत

गाव भेट दौ-यादरम्यान संजोग वाघेरे पाटील यांनी कर्जत-खालापूर, तसेच उरण व पनवेल विधानसभेतील अनेक गावांना भेट दिली आहे.

या दौ-यात ठिकठिकाणी माता-भगिनींकडून औक्षण करून, तर तरुणांकडून फटाक्यांच्या आतिशबाजीने जोरदार स्वागत होत आहे. मतदारांकडून त्यांना विजयासाठी आशिर्वाद दिला जात आहे. संजोग वाघेरे पाटील महिला, ज्येष्ठ नागरिकर, युवा वर्गाच्या भेटीगाठी घेत त्यांची आपुलकीने आणि आदराने विचारपूस केली. मावळचा खासदार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच शिवसेनेचा होणार, अशी प्रचिती सर्वच ठिकाणी येत आहे.

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Exit mobile version