Mirzapur 3 : ‘मिर्झापूर’ या वेब सिरिजच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ‘मिर्झापूर 3′ ची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. असे अशी माहिती खूद्द ओटीटी प्लॅन्टफॉर्म अॅमेझॉन प्राइमने सोशल मीडियावरून दिली आहे. प्राइम व्हिडिओने मंगळवारी 2024 मध्ये येणाऱ्या शो आणि चित्रपटांची माहिती जाहिर केली आहे. Mirzapur 3 latest update
गेल्याने अनेक दिवसांपासून मिर्झापूरचे चाहते मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर देखील वेबसीरिजचा तिसरा भाग कधी येणार अशी विचारणा सातत्याने केली जात होती. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून ‘मिर्झापूर 3’चे पोस्टर रिलीज झाले आहे. प्राइम व्हिडिओने मंगळवारी मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनचा पोस्टर रिलीज केला आहे. 2024 सालच्या या वर्षी मिर्झापूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिर्झापूर 3 च्या सीझनचा पोस्टर
प्राइम व्हिडिओने Mirzapur सीझन 3 च्या रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये सिंहासनाला आग लागल्याचं दिसत आहे. यासोबतच या पोस्टरमध्ये एक बॉडी पडलेली दिसत आहे. सीरीजचे पोस्टर पाहता सत्तेसाठीची ही लढाई सीझन 3 मध्ये पाहायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मिर्झापूर 3 चे कॅप्शन
मिर्झापूर सीझन 3 पोस्टर सोबत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘सिंहासनावर आपला दावा मांडत असताना, गुड्डू आणि गोलू एका नवीन स्पर्धकाविरुद्ध उभे आहेत. ते या आगीतून जातील की बाहेरील शक्ती सत्तेचे हे सिंहासन कायमचे नष्ट करतील?”
चाहत्यांची नाराजी
मिर्झापूर ही प्रचंड गाजलेली वेबसीरिज आहे. याचे दोन पार्ट सुपरहीट झाले आहेत. या वेबसीरिजचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. 19 मार्च रोजी ‘मिर्झापूर3’ चा टीझर रिलीज होणार असल्याची माहिती होती. मात्र या दिवशीही फक्त पोस्टर रिलीज करण्यात आल्याने नेटकरी भडकले आहेत.
यामध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुग्गल, विजय वर्मा, हर्षिता गौर, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, शीबा चड्ढा, राजेश तैलंग, मनु ऋषी चड्ढा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
दरम्यान, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने घोषणा केली होती की, 19 मार्च रोजी काहीतरी मोठे घडणार आहे. तेव्हापासून चाहते या सीरीजची अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक होते.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !