Home पुणे - पिंपरी चिंचवड PCMC : तुकाराम बीज – श्रीक्षेत्र देहूसाठी ‘पीएमपीएमएल’ कडून अतिरिक्त सेवा

PCMC : तुकाराम बीज – श्रीक्षेत्र देहूसाठी ‘पीएमपीएमएल’ कडून अतिरिक्त सेवा

PCMC : Tukaram Bij : Three days service facility from extra buses 'PMPML' to Srikshetra Dehu

आळंदी / अर्जुन मेदनकर : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी तुकाराम बीजनिमित्ताने जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देहूगाव येथे येतात.

पीएमपीएमएलकडून २६ ते २८ मार्च दरम्यान देहूगावसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड (pcmc) शहर तसेच उपनगरांतून तुकाराम बीजनिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक देहूगाव येथे येतात. या वर्षी बुधवारी ( दि. २७) तुकाराम बीज असल्याने नागरिकांना देहूगाव येथे जाण्यासाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका, निगडी या ठिकाणांवरून २६ ते २८ मार्च दरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी झेंडे मळ्या जवळ मिलिटरी परिसरातील मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले असून, तेथून जादा बसेस सुटणार आहेत. pcmc

देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरिता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील.

येथून सुटणार जादा बस

१) स्वारगेट ते देहूगाव
२) मनपा भवन ते देहूगाव
३) मनपा भवन ते आळंदी
४) स्वारगेट ते आळंदी
५) हडपसर ते आळंदी
६) पुणे स्टेशन ते देहूगाव
७) निगडी ते देहूगाव
८) देहूगाव ते आळंदी

भरपूर प्रमाणात बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे, तुकाराम बीज निमित्त शहर
आणि उपनगरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक देहू येथे येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून देहूगाव आणि आळंदीसाठी तीन दिवस जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सतीश गव्हाणे, वाहतूक व्यवस्थापक,
पीएमपीएमएल स्वारगेट

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

Exit mobile version