Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांची जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप दोन्ही बाजूनी एकही उमेदवारांची लिस्ट जाहिर करण्यात आली नाही. अशात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीच्या युतीच्या संदर्भात एक लेटर बाँब टाकला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहलेले. या पत्राने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे की, 17 मार्चला मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समापन महासमारोहात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण त्यादिवशी विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे.
पुढे त्यांनी पत्रात म्हटले आहे की, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा तोच आहे – फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाही विरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे.
या विचाराने मी महाराष्ट्रातील 7 जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मला महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून 7 मतदारसंघांची नावे द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्ण मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देईल. असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.
तसेच, वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे. असेही आवाहन त्यांनी केले आहे.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर