Wednesday, November 13, 2024
Homeताज्या बातम्यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पोलीस आणि अंडरवर्ल्डच्या संबंधावर गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राऊत यांनी स्पष्टपणे सांगितल मनसे अध्यक्ष “राज ठाकरे ज्या भागात भाषण करुन गेले आहेत , तेथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणूक लढवली जात आहे.” तसेच त्यांनी सांगितले की मुंबई, ठाणे, पुणे येथील मतदारसंघात पूर्वी अंडरवर्ल्डशी संबंधित गुन्हेगारांना पक्षाच्या मोहोरक्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राऊत यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही आरोप करत म्हटलं, “वरिष्ठ पोलीस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांना या सर्व प्रकाराची माहिती आहे, पण ते कोणाच्या बाजूने काम करत आहेत हे विचारण्याची वेळ आली आहे. असे अनेक गुंड आहेत, ज्यांचा अंडरवर्ल्डमध्ये सहभाग होता आणि मी त्यांची नाव देखील उघड करू शकतो,” असे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांना थेट आव्हान दिले की, “तुम्हाला वरून कोणत्या गुंडांना मदत करण्याचे आदेश येतात?” राऊत यांनी आरोप केला की मुंबई आणि महाराष्ट्रात गुंडांच्या मदतीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे, जिथे कांजूरमार्ग, भांडूप, दादर, विक्रोळी, ठाणे या भागांत खास गुंड देखील घेण्यात आले आहेत.

याशिवाय, त्यांनी दावा केला की काही नामचीन गुन्हेगारांना निवडणुकीसाठी जामीनावर सोडण्यात आले असून, त्यांच्या मदतीने प्रचारासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पाठवले जात आहे. “वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या रात्रीच्या गुप्त बैठका होत आहेत,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

राज्यातील निवडणूक वातावरणात राऊत यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून,खळबळजनक आरोपांमुळे राज्यातील निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

अमित शाह यांचं शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान; समर्थ रामदासांचा उल्लेख करत गुलामीचा उल्लेख

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

चार दिवसात सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल ; भाजपच्या ‘या’ नेत्याची घोषणा

शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर

नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार

मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

संबंधित लेख

लोकप्रिय