बारामती : नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पणदरे येथे पार पडलेल्या बारामती तालुका शिक्षक समितीच्या त्रेवार्षिक सभेमध्ये बारामती तालुका शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी सचिन हिलाळ, सरचिटणीस पदी पोपटराव गाडे, कार्याध्यक्षपदी दत्तात्रय समगीर, उपाध्यक्षपदी दत्तात्रय पांढरे, कोषाध्यक्षपदी विनायक वाघमारे तर तालुका नेते पदी रमेश येवले यांची सर्वानुमते पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मावळते तालुकाध्यक्ष आबासाहेब जगताप, पुणे जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तसेच निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा शिक्षक समितीचे नेते सुनील वाघ उपस्थित होते.
यावेळी बारामती तालुका शिक्षक समितीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पुणे जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हा प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडी नंतर बोलताना सचिन हिलाळ यांनी सांगितले यापुढे समिती वाढीसाठी मनापासून प्रयत्न केले जातील. तसेच सर्व शिक्षक बांधवांच्या समस्या सोडण्यास सोडवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. प्रास्ताविक विनायक वाघमारे यांनी केले तर आभार बापू जाधव यांनी मानले.


