Monday, May 20, 2024
Homeराज्यमोठी बातमी : महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

मोठी बातमी : महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

औरंगाबाद : महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार असल्याचा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठानं दिलाय.

तृतीयपंथी अंजली पाटील यांना औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिलाय. जळगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 जानेवारीला छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीयपंथीयाच्या उमेदवारी अर्जावरून चांगलेच ‘महाभारत’ घडले. अखेर ते प्रकरण न्यायालयात गेले असून, महिलेच्या जागेवर लढण्याचा तृतीयपंथीयाला अधिकार असल्याचा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठानं दिलाय. 

जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडली होती. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेत अर्ज बाद केला. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर महिलेनं न्यायालयात धाव घेतली, अखेर औरंगाबाद कोर्टानं तृतीयपंथीयांच्या बाजूनं निर्णय दिला.

यावेळी पत्रकारांकडे आपली बाजू मांडताना तृतीयपंथी अंजली पाटील यांनी सांगितले की, “मी एक तृतीयपंथी आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर भारत सरकारने दिलेले आधार कार्ड, मतदान कार्डही आहे. त्यावर देखील माझा तृतीयपंथी म्हणून उल्लेख आहे. असे असताना मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केला आहे”. माझा अर्ज जर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दाखल करता येत नव्हता, तर मला अर्ज दाखल करतेवेळी किंवा अर्ज बाद करण्यापूर्वी विहित वेळेत कळवायला हवे होते. आता मला न्याय हवा आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय