Friday, November 22, 2024
Homeजुन्नरउच्छिल येथे नवागतांचे स्वागत व शैक्षणिक साहित्याचे वाटप

उच्छिल येथे नवागतांचे स्वागत व शैक्षणिक साहित्याचे वाटप

Junnar/आनंद कांबळे : शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ या वर्षाचे औचित्य साधून शनिवार (दि. १५) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल येथे नवागतांचे स्वागत व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नवले कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित उच्छिल आदिवासी सोसायटीचे संचालक लक्ष्मण बगाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्या कांचन नवले, पालक सदस्य शिवाजी नवले तर उपस्थित वर्षा गणेश नवले, सखाराम नवले, शांताबाई नवले आणि विमल करवंदे हिराबाई नवले यांसह इतर पालक उपस्थित होते. (Junnar)

या निमित्ताने इयत्ता पहिलीच्या नूतन दहा विद्यार्थ्यांचे फेटे बांधून, ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करून व गुलाब पुष्पे देऊन आणि मोफत पाठ्यपुस्तके दप्तर, वह्या, पेन, पेन्सिल इत्यादी शैक्षणिक साहित्य सातवी पर्यंतच्या सर्व मुलांना सर्व शिक्षकांच्या दातृत्वातून लोकसहभागातून सर्व इयत्ता पहिली ते सातवीच्या ७७ विद्यार्थ्याना स्कूल बॅग, कंपास पेन वह्या व कंपास आणि इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. (Junnar)

या प्रसंगी शरद नवले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, पश्चिम आदिवासी भागातील डोंगरातली शाळा आपण सर्वांनी ताऱ्यासारखी जिल्ह्यात चमकवली याचे सर्व श्रेय हे तुम्हा सर्वांचे असून शाळेत सर्व प्रकारच्या सोयी सुविधा झाल्या असून भविष्यातही आपल्या शाळेसाठी जी मदत लागेल ती आम्ही करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले, उपाध्यक्ष सागर बगाड, शिक्षणतज्ज्ञ सदस्य जयराम नवले, सदस्य रविंद्र भालेराव, पांडूरंग भालेराव, सुभाष बांबळे, संतोष शिंदे तर सदस्या सविता आढारी, रेश्मा केंगले, राणी नवले, वर्षा नवले तर ग्रा.पं सरपंच मंगेशभाऊ आढारी, उपसरपंच मारुती खिलारी, सदस्य दशरथ नवले, सचिव अश्विनी साबळे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी तर नियोजन व मान्यवरांचे सत्कार स्मिता ढोबळे, आरती मोहरे व लिलावती नांगरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुभाष मोहरे यांनी केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : वाराणसीत पंतप्रधान मोदींच्या कारवर चप्पल फेक ?

मोठी बातमी : हज यात्रेत 550 जणांचा उष्मघाताने मृत्यू !

मोठी बातमी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे वितरण

ब्रेकिंग : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी मोठी भरती

वन विभाग अंतर्गत भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

ब्रेकिंग : एक रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात, असा करा अर्ज !

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

ब्रेकिंग : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पाय कार्यकर्त्याने धुतले, राजकारण तापले

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

धक्कादायक : पाणीपुरी खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा, परिसरात खळबळ

मोठी बातमी : राहुल गांधी यांचा वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा

संबंधित लेख

लोकप्रिय