१) टिकटॉकच्या चीनच्या मालकाने त्यांच्या कंपनीचा काही भाग अमेरिकेला विकण्यासाठी तयारी सुरू केली
न्युयॉर्क, अमेरिका: टिकटॉक कंपनीचा काही भाग अमेरिकेतील गुंतवणुकदाराला विकण्यासाठी चर्चा त्यांच्या चीनी मालकाने सुरू केली. कालच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टिकटॉक बंद करणार असल्याची घोषणा केली होती.
२)चीन आणि नेपाळ एकमेकांना बरोबरीची वागणूक देतात: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
काठमांडू, नेपाळ: नेपाळ आणि चीनच्या द्विपक्षिय संबंधाला आज ६५ वर्ष झाली. त्यामुळे आज नेपाळचे राष्ट्रपती बिंन्दा देवी भंडारी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग यांनी एकमेकांबरोबर संवाद साधला.
३)ब्राझीलच्या ॲमॅझॉन जंगलात लागणाऱ्या आगींमध्ये जुलैमध्ये २८% नी वाढ झाली, तज्ञ चिंतेत
ब्राझिलीआ, ब्राझील: तज्ञांच्या मते सरकार आग लागण्याचे प्रमाण करण्यात पुर्णत: असफल ठरले असून त्यांकडून मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष केल्याचे समोर आणले आहे. त्यामुळे यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता असल्याचे ही त्यांनी वर्तवले.
४)फेसबुक ब्राझीलच्या न्यायलयापुढे झुकले, १२ राष्ट्राध्यक्ष बोर्सेनारोंची फेसबुक खाती बंद
ब्राझीलिआ, ब्राझील: ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष बोर्सेनारोंच्या १२ समर्थकांनी दंगे भडकवणारी भाषणे केल्याच्या कारणाने त्यांची फेसबुक खाती बंद करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते.
५)५०० किलो कोकेन विमानात ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी जप्त केले
मेलबॉर्न, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी ५०० किलो कोकेन जप्त करत ५ व्यक्तींना अटक केली. ते विमानाने त्याची वाहतुक करत होते असे समोर आले आहे.
६)स्पेस एक्स कंपनीचे अवकाश यान जागतिक अवकाश संशोधन केंद्रापासून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने निघाले
केप कानावेल, अमेरिका: स्पेस एक्स या खाजगी कंपनीचे अवकाश यान पुन्हा पृथ्वीच्या दिशेत निघाले असून ते समुद्रात उतरवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथमच लोकांनी प्रवास केला.
७)अरब अमिरियतने पहिली अणुभट्टी उभारण्याची घोषणा केली
दुबई: तेलाच्या उत्पादनात अग्रणी अरब देश आता अणूभट्टी उभारणार असून त्याद्वारे वीज निर्मिती करणार आहे असे त्यांनी घोषणेत सांगितले. त्यासाठी १५००० कोटींपेक्षा जास्त खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
८)अमेरिकेच्या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला इराणने पकडले: इराण
तेहरान, इराण: अमेरिकेच्या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाला इराणच्या संरक्षण यंत्रणेने पकडले असल्याचा दावा इराणने केला असून तो २००८ च्या मस्जिद बॉम्ब हल्ल्याचा प्रमुख असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्याला CIA ने मोठी मदत केली असल्याचा आरोप इराणने केला.
९)व्हिएतनामने संपुर्ण शहरातील नागरिकांची कोरोनाचाचणी घेतली
हानोई, व्हिएतनाम: व्हिएतनाममध्ये कोरोना रूग्ण आढळल्यानंतर व्हिएतनामने संपुर्ण शहर तपासण्यात येणार असल्याची घोषणा केली होती त्याप्रमाणे कार्यवाही केली. त्या शहरात ११ लाख नागरिक होते.
१०)दक्षिण आफ्रिकेत कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख पार
जॉहेन्सबर्ग, दक्षिण आफ्रिका:दक्षिण आफ्रिकेत १०१०७ नवे रूग्ण आज आढळले असून आता कोरोना बाधितांची संख्या ५०३२९० झाली आहे. त्यापैकी ८१५३ लोकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला आहे.