Tuesday, January 14, 2025
HomeनोकरीRCFL Recruitment 2021 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

RCFL Recruitment 2021 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायझर्स लिमिटेडने ऑपरेटर ग्रेड (केमिकल) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या पदाकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून 2021 आहे .

■ पदाचे नाव : ऑपरेटर ग्रेड (केमिकल) 

 एकूण पदे : 50

● शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एस्ससी पदवी प्राप्त असावा.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या इच्छूक उमेदवाराचे वय 36 वर्षांपेक्षा अधिक नसावे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी (OBC) वर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी (SC) आणि एसटी (ST) वर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

● अर्ज शुल्क : अर्जासाठी शुल्क खुला गट आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांकरिता अर्ज शुल्क 700 रुपये आहे. एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांकरिता कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. 

■ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2021

■ अधिकृत वेबसाइट : www.rcfltd.com


संबंधित लेख

लोकप्रिय