पुणे: रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्यांसाठी आणि दुकानदारासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रेशन दुकानात लवकरच ई-सेवा सुविधा सुरू करण्यात येणार आहे. हा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार…
कारण डीलर्सचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि लोकांना बँकिंग, कागदपत्रे आणि इतर सेवा जवळच्या रेशन दुकानांवर उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेतला आहे. योजनेअंतर्गत, प्रत्येक रेशन डीलरचा CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) आयडी उघडला जाईल आणि डीलरला VLE (ग्रामस्तरीय उद्योजक) बनवले जाणार आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती
रेशन डीलर्सना सीएससी सेवांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रत्येक सेवेवर मिळणाऱ्या उत्पन्नाचीही माहिती दिली जाईल. अजमेरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याची योजना आहे.
केंद्र सरकारला कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून देशातील प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात सीएससी केंद्रे उघडायची आहेत, जेणेकरून लोकांना केंद्रापासून राज्य सरकारपर्यंतच्या सर्व योजनांची माहिती मिळू शकेल. यासोबतच लोकांना बँकिंग आणि ऑनलाइन सेवांचाही लाभ मिळावा. असे केल्याने सर्वसामान्यांची शासकीय विभागांच्या फेऱ्यांपासून सुटका होणार आहे.
कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड
विशेष : भारतात आकाशातून पक्षी पडतायत पण का? वाचा !