Monday, July 15, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्राझील मध्ये मुसळधार पावसाने 37 जणांचा मृत्यू तर 5000 विस्थापित !

ब्राझील मध्ये मुसळधार पावसाने 37 जणांचा मृत्यू तर 5000 विस्थापित !

 ब्राझील : ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगभरातील हवामान बदलावर परिणाम होऊ लागला आहे. परिस्थिती अशी आहे की, आफ्रिकन देशांत भीषण दुष्काळामुळे उपासमारीबरोबरच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.त्याच वेळी, जगाच्या काही भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. ताजं प्रकरण ब्राझीलमधलं आहे. ब्राझीलच्या ईशान्य भागात मुसळधार पावसामुळे 37 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे 5,000 इतर विस्थापित झाले.

आश्रम वेब सिरीज : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची एन्ट्री, ट्रेलर पाहून चाहते म्हणाले – आग लागणार…

स्थानिक नागरी संरक्षणाचा हवाला देत सिनहुआ या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, ईशान्येकडील पेर्नमबुको राज्याची राजधानी रेसिफे सिटीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे सर्वाधिक 35 लोक मरण पावले आहेत, सुमारे 1,000 इतरांनी आपली घरे सोडली आहेत आणि मदत छावण्यांमध्ये स्थलांतर केले आहे. भूस्खलनात 26 जणांना जीव गमवावा लागला त्याच वेळी, अलागोस राज्यात पावसात दोघांचा मृत्यू झाला, तर 4,000 हून अधिक लोकांना

कर्मचारी राज्य विमा निगम (ESCI) मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या आपत्तीत अनेक जण जखमीही झाले आहेत. शनिवारी, रेसिफेमध्ये भूस्खलनात 20 लोक ठार झाले, तर जवळच्या कॅमारा गिबे शहरात भूस्खलनात सहा जणांचा मृत्यू झाला. पेनरामबुको वॉटर अँड क्लायमेट एजन्सीनुसार, रेसिफेमध्ये शनिवारी 150 मिमी पावसाची नोंद झाली, तर कुमार गिबेमध्ये 129 मिमी पावसाची नोंद झाली.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण मध्ये रिक्त पदासाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय