Saturday, May 18, 2024
HomeNewsवीज विभागाच्या गलथान कारभारा विरोधात किसान सभा करणार रास्ता रोको

वीज विभागाच्या गलथान कारभारा विरोधात किसान सभा करणार रास्ता रोको

घोडेगाव : अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने वीज विभागाच्या गलथान कारभारा विरोधात गुरूवार दि. १ डिसेंबर २०२२ रोजी तळेघर या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे नेते अशोक पेकारी यांनी दिली.

आदिवासी भागातील नागरिकांना भरमसाठ विजबिले देऊन वीज विभाग या भागातील नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देत आहे. रिडींग घेतली जात नाही, लाईट बिल घर पोहच दिली जात नाही अशा अनेक समस्या आहेत, असल्याचे किसान सभेच्या वतीने सांगण्यात आले.

• रास्ता रोको आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

१) भरमसाठ येणारी वीज बिले त्वरित रद्द करा.

२) नाद्रुरुत आणि जळालेले मिटर विनामुल्य बदलून द्या.

३) लाईट बिले कमी करण्यासाठी भिमाशंकर व आहुपे खोऱ्यातील लोकांना घोडेगाव येथे जावे लागत असल्याने आपले कर्मचारी तळेघर, अडविरे, डिंभे या ठिकाणी आठवड्याच्या बाजारात उपलब्ध असावेत.

४) गेल्या २० ते २५ वर्षापासून वीज विभागाने रिडिंग न घेतल्याने, वीज ग्राहकाने नियमित बील भरूनही, जे जास्तीचे रिडिंग दाखवले जात आहे ते त्वरित रद्द करा.

५) रिडिंग नुसार विजे बिले मिळावीत.

६) ज्या गावची डीपी, वीज लाईन खराब झाली आहेत, ती त्वरित दुरूस्ती करून किंवा नवीन मिळावी.

7. गावनिहाय वायरमन व त्यांचे फोन नंबर याबरोबरच गावनिहाय रिडींग घेणारे व बिल देणाऱ्या व्यक्तींची नावे व फोन नंबर तत्काळ द्यावेत.

वरिल मागण्या सोडवण्यासाठी विद्यतु विभागाचे अधिकारी शैलैश गिते, विद्युत वितरण कंपनीचे सहा. अभियंता घोडेगाव यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास १ डिसेंबर २०२२ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा किसान सभा आंबेगाव तालुका समित अशोक पेकारी, दत्ता गिरंगे, अशोक जोशी, अनिल सुपे, नंदा मोरमारे, राजू घोडे, रामदास लोहकरे, देविका भोकटे, लक्ष्मण मावळे यांनी दिला आहे.

Lic
Lic
No comments to show.
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय