Tuesday, May 7, 2024
HomeNewsरासेयो शिबीर हे सुजाण नागरिक घडविणारे विचारपीठ:- डॉ प्रकाश वट्टी

रासेयो शिबीर हे सुजाण नागरिक घडविणारे विचारपीठ:- डॉ प्रकाश वट्टी

राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांचे उन्नयन घडविणारे उपक्रम आहे. व्यक्तिमत्व विकासात विद्यार्थ्यांमध्ये पोषक वातावरण निर्माण करणारे घटक म्हणजे सयंम, शिस्त, सहानुभूती, सामाजिक जाणीव, सामाजिक बांधिलकी व चारित्र्य संवर्धन करणाऱ्या विचारांची देवाणघेवाण होत असल्याने खरं तर विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती निर्माण होते.ही पायाभरणी रासेयो शिबीरातून होत असते. पुढे महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घेत समाजात आदर्श व्यक्ती म्हणून समाजात आपले स्थान प्राप्त करतात हे विद्यार्थ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा टप्पा रासेयो शिबीर ठरतो. असे मौलिक विचार डॉ प्रकाश वट्टी यांनी रासेयो विभागिय समन्वयक गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. यांचे मौजा खरकाडा येथिल ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय,चौघान व्दारा आयोजित रासेयो शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमात विचार व्यक्त केले.

यावेळी विचारपीठावर कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष रुपेश निहाटे होते तर , ज्ञानदीप प्रशासकीय महाविद्यालय चौघान चे प्रभारी प्राचार्य सुमेध वालदे,प्रमुख पाहुणे तंटामुक्ती समिती अध्यक्ष उत्तम बगमारे, श्री तोंडरेसर, श्री चहांदे सर, गोपाल करंबे व प्रशासकीय महाविद्यालय चौघान येथिल सर्व शिक्षक, रासेयो, स्वयंसेवक व मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी श्री तोंडरे सर, व कवी उत्तर बगमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. शिबीरार्थ्याचे उत्तम उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले. यावेळी प्राचार्य सुमेध वालदे यांनी. मला रासेयो स्वयंसेवक असतांना शिबीराचे नियोजन कसे करावे हे डॉ वट्टी सरांनी शिकविले हे मी त्यांचे ऋण मी विसरू शकत नाही. असे सुतोवाच केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपेश निहाटे यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी आत्मसात करावे असे मौलिक मार्गदर्शन केले. यानंतर उत्तम कार्य करणा-या विद्यार्थ्याचे स्मृती चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक प्रणय खरकाटे यांनी केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,अजय चुलके व आभार ज्ञानेश्वरी बनपूरकर.हिने केले तर शिबीर यशस्वी करण्यासाठी संकल्प चहांदे, रवीना बुल्ले राजेश मेश्राम , तृप्ती बनकर,व विकी सोनलने यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय