मुंबई : औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे.
मुंबईत गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेपासून राज ठाकरे सातत्याने चर्चेत आहे. मुंबईत झालेल्या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग हटवण्यासाठी राज्य सरकारला तीन मे पर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या या अगोदर झालेल्या मुंबई आणि ठाण्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर आजची औरंगाबादमधील सभा देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यात पोलिसांनी मोठी हालचाल केली आहे. पोलिसांनी मुंबई, ठाण्यातल्या मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना 149 च्या नोटीसा बजावल्या आहेत.
महागाईचा भडका : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ
10 वी / ITI उत्तीर्णांना संधी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांची मोठी भरती
सीमा सुरक्षा दलात 90 पदांसाठी भरती, 1 लाख रूपये पगाराच्या नोकरीची संधी