मुंबई (वर्षा चव्हाण) – शासकीय सेवेत पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पत्नीलाही पेन्शनचा लाभ घेता येतो हे आपल्या सर्वांना माहिती असेलच. पण आता निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकार कडून सुधारणा करण्यात आली असून त्याची आमलबजावणी राज्यात सुद्धा केली जाणार आहे. (Mumbai)
निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर विसंबून असलेल्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने संबंधित व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील अविवाहित अपत्य, घटस्फोटीत, विधवा मुलगी, मनोविकृती व अपंग सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
🔴कोणाला मिळणार लाभ?`
मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषीतर विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना लागू राहील.
Mumbai
⚫नक्की काय झाला बदल ?
आता शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पती किंवा पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याबाबत निवृत्ती वेतनाबाबत सुधारणा केली आहे. केंद्र शासनाने केलेल्या सुधारण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन
‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…
केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ
तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू
पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्टर
Jio च्या ‘या’ स्वस्तातील रिचार्ज प्लॅनमध्ये 12 ओटीटी आणि अमर्यादित 5 जी डेटा
आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत
आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार